IPL: आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या चायनामॅन कुलदीप यादवने केले हे विधान

IPL 2022
Updated Apr 12, 2022 | 17:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kuldeep Yadav's statement after performance against KKR: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज कुलदीप यादवने मोठे विधान केले आहे. 

kuldeep yadav
IPL: भारताच्या चायनामॅन कुलदीप यादवने केले हे विधान 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२मध्ये कुलदीप यादव पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये दिसला
  • दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केकेआर सामन्यात दाखवला जलवा
  • आपल्या शानदार पुनरागमनासाठी कुलदीप यादवने केले विधान

मुंबई: भारताचा रहस्यमयी चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव(kuldeep yadav) पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसू लागला आहे. आपला नवा संघ दिल्ली कॅपिटल्सशी(delhi capitals) खेळाना कुलदीप यादव चांगली कामगिरी करत आहे. नुकत्याच त्याने जुना संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध(kolkata knight riders) चार विकेट घेत सगळ्यांची मने जिंकणाऱ्या यादवने आपला नवा संघ आणि स्वत:च्या कामगिरीबाबत विधान केले आहे.Big statement of kuldeep yadav in match performance 

अधिक वाचा - दर्शन टोकनसाठी भाविकांची गर्दी, बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी

कुलदीप यादवच्या मते सध्याच्या सत्रात गोलंदाजी त्यांच्या संघाचा मजबूत पक्ष आहे आणि वेगवान गोलंदाज पॉवरप्ले दरम्यान प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकत चांगली कामगिरी करत आहेत. कुलदीप म्हणाला, सध्याच्या हंगामात गोलंदाजीतील आमची कामगिरी सगळ्यात सकारात्मक बाजू आह. जेव्हा आम्ही पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी केली होती तेव्हा एका वेळेस असे वाटत होते की ते २००पेक्षा जास्त धावा करतील मात्र आम्ही त्यांना ५ बाद १७७ धावांवर रोखले. 

कुलदीप पुढे म्हणाला, वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाज करत आहेत. त्याने नाईट रायडर्सविरुद्ध दबाव राखला त्यामुळे आम्हाला खुलेपणाने गोलंदाजी करता आली. 

शानदार कॅचबाबत काय म्हणाला

सामन्यात ३५ धआवा देत चार विकेट मिळवल्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅच ठरवण्यात आले. कुलदीपने आपल्याच बॉलवर शानदार कॅच घेतला होता. त्या कॅचबद्दल म्हणाला, मला माहीत होते की मीच तो कॅच पकडू शकतो. बाकी इतरांपासून बॉल दूर होता. कॅचसाठी धावताना माझे पूर्ण वेळ बॉलकडे लक्ष होते. कॅच घेतल्यावर छान वाटले. 

अधिक वाचा - या कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना भेट दिल्या मारुती कार

दिल्लीला मोठा ब्रेक

पुढील सामन्याआधी दिल्लीच्या संघाला पाच दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. कुलदीपने सांगितले, हे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. संघाचे मनोबल वाढलेले असेल आम्हाला पुढचा सामना शनिवारी खेळायचा आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी