मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा संघ आयपीएल २०२२मध्ये अद्याप एकही विजय मिळवू शकलेला नाही. रोहित ब्रिगेडने अद्याप विजयाचे खाते खोललेले नाही. संघाला बुधवारी सलग ५व्या पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात पंजाब किंग्सने ५वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला १२ धावांनी हरवले. हा पंजाबचा ५ सामन्यांतील तिसरा विजय आहे. सोबतच संघ पॉईंट टेबलमध्ये टॉप ३मध्ये पोहोचली आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईचा संघ सर्वात खाली १०व्या स्थानावर आहे. can mumbai indian reach in play off of ipl 2022?
अधिक वाचा - राज ठाकरेंच्या आंदोलनाचे उत्तरप्रदेशात उमटले पडसाद?
सामन्यात पंजाबने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १९८ धावांवर बाद केले. कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवनने अर्धशतकीय खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ९ बाद १८६वर बाद झाला. ओडियन स्मिथने ४ विकेट मिळवल्या. कॅगिसो रबाडाने २ विकेट मिळवल्या.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या २ हंगामात सुरूवातीचे ५ सामने हरणारा पहिला संघ ठरला आहे. याआधीही २०१४मध्ये त्यांना सलग ५ सामन्यांत पराभवास सामोरे जावे लागले होते. याशिवाय २०२मध्ये डेक्कन चार्जर्स, २०१३मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि २०१९मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघालाही ५ सामने गमवावे लागले होते. आता सवाल असा आहे की मुंबईचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो का? रेकॉर्ड सांगतात मुंबईच्या संघाने हे केले आहे. २०१४मध्येही मुंबईचा संघ सलग ५ सामने हरल्यानंतरही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला होता. मात्र यावेळीस टी-२० लीगमध्ये ८ ऐवजी १० संघ आहेत. त्यामुळे हे तितकेसे सोपे असणार नाही.
२०१४च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला होता. राजस्थानने पहिल्यांदा खेळताना ४ बाद १८९ हा चांगला स्कोर केला होता. संजू सॅमसन आणि करूण नायरने अर्धशतके झळकावली होती. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना १४.४ ओव्हरमध्ये जिंकायचा होता. कोरी अँडरसनने यावेळी अतिशय धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीने मुंबईला केवळ जिंकवलेच नाही तर प्लेऑफमध्येही पोहोचवले.
अधिक वाचा - रॉकेटच्या वेगाने थ्रो फेकल्याने थांबवावा लागला सामना
न्यूझीलंडच्या या आक्रमक खेळाडूने ४४ चेंडूत नाबाद ९५ धावा ठोकल्या होत्या. त्याने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले होते. त्याने ७२ धावा केवळ बाऊंड्रीने बनवल्या होत्या. अंबाती रायडूनेही १० बॉलमध्ये ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या होत्या. मुंबईला शेवटच्या बॉलवर २ धावा हव्या होत्या. पहिलाच बॉल खेळत असलेल्या आदित्य तरेने जेम्स फॉकनरच्या बॉलवर सिक्सर ठोरला आणि विजय मिळवून दिला होता.
मुंबईच्या संघाने अखेरीस १४ लीगमधील सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवला होता. त्यांचे आणि राजस्थानचे अंक १४-१४ झाले होते. मात्र चांगल्या रनरेटमुळे ते प्लेऑफमध्ये पोहोचले होते. मात्र त्यांना एलिमिनेटर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून ७ विकेटनी पराभव स्वीकारावा लागला आणि संघ फायनलमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. फायनला सामना केकेआरने जिंकला होता. त्यांना फायनलमध्ये पंजाब किंग्सला ३ विकेटनी मात दिली होती.