IPL 2021 : ये मुंबई है भाया ! संघासह कर्णधार रोहित शर्माने केला गजब विक्रम; टी20 क्रिकेटमधील भारताचा नवा सिक्सर किंग

IPL 2021
भरत जाधव
Updated Oct 06, 2021 | 10:22 IST

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI)  या दोन संघामध्ये पार पडला. हा सामना प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा होता.

Captain Rohit Sharma set an amazing record with the team
कर्णधार रोहित शर्माने केला गजब विक्रम; टी20 क्रिकेटमधील भारताचा नवा सिक्सर किंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सची गुणतालिकेतही पाचव्या स्थानी झेप
  • अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत राजस्थान रॉयल्सचा केला पराभव
  • टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI)  या दोन संघामध्ये पार पडला. हा सामना प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत करत मुंबईने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तसेच गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवे स्थान मिळवले आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईचा हा सहावा विजय असून कर्णधार रोहित शर्माने या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहितचा पराक्रम

टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात 398 षटकार होते. राजस्थानविरुद्ध त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताच्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर सुरेश रैना 325 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 1042 षटकार ठोकले आहेत. 1000 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

मुंबईचाही विक्रम

मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्धचे लक्ष्य केवळ  8.2 षटकांत पूर्ण केले. आयपीएलमध्ये 70 किंवा अधिक चेंडू शिल्लक असताना दोनदा सामने जिंकणारा मुंबई एकमेव संघ बनला आहे. याआधी 2008 मध्ये संघाने केकेआरला 87 चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केले होते. 67 धावांवर कोलकाता संघ गारद झाला होता, मुंबईने 5.3 षटकांत लक्ष्य गाठले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी