IPL मॅच फिक्सिंग प्रकरणात तीन जणांना अटक, CBI कडून पाकिस्तानशी संबंधित फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated May 14, 2022 | 18:29 IST

IPL Match Fixing : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन जणांना अटक केली आहे.

IPL 2022
IPL मॅच फिक्सिंग प्रकरणात तीन जणांना अटक, CBI कडून पाकिस्तानशी संबंधित फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फिक्सिंग आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी सीबीआयची कारवाई
  • दिल्लीतील एक आणि हैदराबादमधील दोघांचा समावेश
  • सट्टेबाजांचा पाकिस्तानशी संबंध

मुंबई : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दिल्लीतील एक आणि हैदराबादमधील दोघांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचा पाकिस्तानशी संबंध असण्याची शक्यता असून याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने तपास सुरू केला आहे. सीबीआयने या प्रकरणात पाकिस्तानशी संबंधित फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. (CBI arrests three people in IPL match-fixing case, bookies' links to Pakistan)

अधिक वाचा : 

IPL 2022: IPL २०२२ मध्ये या खेळाडूंवर मोठा अन्याय! हंगामात एक सामना खेळण्यासाठीही तरसले 

वृत्तसंस्था, पीटीआयने सीबीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की 2019 मधील आयपीएल सट्टेबाजीचे स्ट्रिंग पाकिस्तानपर्यंत होते, पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे सामन्यांवर प्रभाव पडला होता. याप्रकरणी सीबीआयनेही गुन्हा दाखल केला असून त्यानंतर तिघांना ताब्यात घेतले आहे. IPL 2019 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावेने धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले.

अधिक वाचा : 

IPL 2022: पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग?

तपास यंत्रणेने पुढे सांगितले की, दिल्लीतील रोहिणी येथून अटक केलेल्या व्यक्तीचे नाव दिलीप कुमार आहे, तर गुरम वासू आणि गुराम सतीश यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. हे लोक 2013 पासून त्यांचे नेटवर्क चालवत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी