T-20world cup:टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये हा बदल, अक्षरच्या जागी या क्रिकेटरला संधी

IPL 2021
Updated Oct 13, 2021 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती.

icc t-20 world cup
टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये बदल 

थोडं पण कामाचं

  • टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा बदल केला आहे.
  • आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शार्दूल ठाकूरची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली.
  • संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला मुख्य टी-२० संघाा भाग बनवण्यात आला आहे.

मुंबई: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा बदल केला आहे. संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला मुख्य टी-२० संघाा भाग बनवण्यात आला आहे. तर आधी सामील करण्यात आलेल्या अक्षर पटेलला १५ सदस्यीय संघातून बाहेर काढून स्टँड बाय खेळाडूंना या यादीत सामील केले आहे. संघात ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कायम आहे. 

पांड्यावर पुन्हा बीसीसीआयने ठेवला विश्वास

हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. दुसऱ्या टप्प्यात ५ सामन्यांमद्ये केवळ ७५ धावा केल्या. खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या संपूर्ण हंगामात त्याने गोलंदाजी केली नाही. यानंतरही बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. 

शार्दूलची जबरदस्त कामगिरी

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शार्दूल ठाकूरची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. या स्पर्धेत आतापर्यंत ठाकूरने १५ सामन्यांमध्ये २७.१७च्या सरासरीने एकूण १८ विकेट मिळवल्या. दुसऱ्या टप्प्यात ८ सामन्यांमध्ये १७.०७च्या सरासरीने १३ खेळाडूंना आऊट करत मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. 

ICC T20 वर्ल्डकपसाठी संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. 

स्टँड-बाय खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी