चेन्नईचा धूमधडाका, ६ विकेट राखून विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2021 | 00:40 IST

आयपीएल २०२१ची आठवी लीग मॅच चेन्नईने गाजवली. वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच चेन्नई सुपरकिंग्सने सहा विकेट राखून जिंकली.

Chennai Super Kings beat Punjab Kings by 6 wickets
चेन्नईचा धूमधडाका, ६ विकेट राखून विजय 

थोडं पण कामाचं

  • चेन्नईचा धूमधडाका, ६ विकेट राखून विजय
  • चेन्नईकडून मोईन अलीने ३१ चेंडूत ४६ आणि फाफ डू प्लेसिसने ३३ चेंडूत ३६ धावा केल्या
  • चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या

मुंबईः आयपीएल २०२१ची आठवी लीग मॅच चेन्नईने गाजवली. वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच चेन्नई सुपरकिंग्सने सहा विकेट राखून जिंकली. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने पंजाब किंग्सला २० ओव्हरमध्ये आठ बाद १०६ धावा एवढीच मजल मारू दिली. नंतर तुफान फटकेबाजी करत चेन्नई सुपरकिंग्सने १५.४ ओव्हरमध्येच ४ बाद १०७ धावा करुन मॅच सहा विकेट राखून जिंकली. पूर्ण मॅचवर चेन्नई सुपरकिंग्सचे वर्चस्व दिसले. Chennai Super Kings beat Punjab Kings by 6 wickets

चेन्नईकडून मोईन अलीने ३१ चेंडूत ४६ आणि फाफ डू प्लेसिसने ३३ चेंडूत ३६ धावा केल्या. सुरेश रैनाने ९ चेंडूत ८, सॅम करणने ४ चेंडूत ५ आणि सलामीर ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत ५ धावा केल्या. अंबाती रायुडू शून्यावर बाद झाला. पंजाबकडून मोहम्मद शमीने दोन तर अर्शदीप सिंह आणि मुरुगन अश्विन या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुरुवात अतिशय संथ झाली. सलामीची जोडी लवकर फुटली. मयंक अग्रवाल शून्यावर परतला. के एल राहुल पाच धावा करुन धावचीत झाला. ख्रिस गेल आणि दीपक हूडा यांनी प्रत्येकी दहा धावा केल्या तर निकोलस पूरन शून्यावर परतला. यामुळे सातव्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सची अवस्था पाच बाद २६ धावा एवढी वाईट होती. शाहरूख खानने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ४७ धावा केल्या. रिचर्डसनने १५ धावा केल्या. मुरुगन अश्विनने सहा धावा केल्या तर मोहम्मद शमीने नाबाद नऊ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. सॅम करण, ड्वेन ब्राव्हो आणि मोईन अली या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी