चेन्नई नंबर वन; गायकवाड, प्लेसिस चमकले

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 29, 2021 | 02:08 IST

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २३व्या लीग मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला. हा चेन्नईचा सहा लीग मॅचमधील पाचवा विजय आहे.

Chennai Super Kings beat Sunrisers Hyderabad by 7 wickets
चेन्नई नंबर वन; गायकवाड, प्लेसिस चमकले 

थोडं पण कामाचं

  • चेन्नई नंबर वन; गायकवाड, प्लेसिस चमकले
  • चेन्नईचा सहा लीग मॅचमधील पाचवा विजय
  • चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २३व्या लीग मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला. हा चेन्नईचा सहा लीग मॅचमधील पाचवा विजय आहे. या विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर सहा पैकी पाच लीग मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तळाच्या आठव्या स्थानावर आहे. Chennai Super Kings beat Sunrisers Hyderabad by 7 wickets

चेन्नईचा संघ २० ओव्हरमध्ये १७२ धावा करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळत होता. त्यांनी १८.३ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७३ धावा केल्या आणि हे लक्ष्य साधले. चेन्नईने सात विकेट राखून मॅच जिंकली. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड (७५ धावा) आणि फाफ डु प्लेसिस (५६ धावा) या जोडीने केलेल्या अर्धशतकांमुळे चेन्नईच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. मोईन अली आठ धावा करुन बाद झाला. रविंद्र जडेजा (नाबाद ७ धावा) आणि सुरेश रैना (नाबाद १७ धावा) या दोघांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानने तीन विकेट घेतल्या. 

याआधी सनरायझर्स हैदराबादने चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० ओव्हरमध्ये ३ बाद १७१ धावा केल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५७ धावा) आणि मनिष पांड्ये (६१ धावा) या दोघांनी अर्धशतके झळकावली. वॉर्नरच्या साथीला आलेला जॉनी बेअरस्टो सात धावा करुन परतला. पण वॉर्नर-पांड्ये जोडीने शतकी भागीदारी केली. वॉर्नर आणि पांड्ये बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या केन विल्यामसन (नाबाद २६ धावा) आणि केदार जाधव (नाबाद १२ धावा) यांनी आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली पण त्यांना पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठण्यात अपयश आले. चेन्नईच्या लुंगी नगिडीने दोन तर सॅम करणने एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी