IPL 2021:चेन्नईच्या या सलामीवीराने केला ऑरेंज कॅपवर कब्जा

IPL 2021
Updated Apr 29, 2021 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Faf du plessis is on top in orange cap race सर्वाधिक धावा करण्याच्या फलंदाजांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस पहिल्या स्थानावर आहे

chennai super kings
IPL 2021:चेन्नईच्या या सलामीवीराने केला ऑरेंज कॅपवर कब्जा 

थोडं पण कामाचं

  • फाफ डू प्लेसिसने चौथ्या स्थानावरून सरळ पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.
  • तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल आहे.
  • सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय आहेत.

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या(indian premier league) १४व्या हंगामात मोठे मोठे स्कोर पाहायला मिळत आहेत. स्पर्धेत आतापर्यंत धावा बनवण्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे(chennai super kings) सलामीवीर टॉपवर आहेत. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यासनरायजर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकण्यासोबतच

स्थानावर भारतीय फलंदाज आहेत. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय आहेत. 

फाफ डू प्लेसिस(faf du plesis)

फाफ डू प्लेसिसने चौथ्या स्थानावरून सरळ पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सलामीला फलंदाजी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसने ६ सामन्यांत ३ अर्धशतके ठोकली आहेत. या अर्धशतकांसह २७० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची नाबाद ९५ धावांची खेळी सर्वोत्तम आहे. 

शिखर धवन(shikhar dhawan)

सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन टॉपवर होता. बुधवारी तो दुसऱ्या स्थानावर घसरला. ६ सामन्यात त्याने ४४च्या सरासरीने या फलंदाजाने २६५  धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ९२ धावांची सर्वाधिक खेळी केली होती. यात धवनने ३३ चौकार आणि ५ षटकार ठोकले आहेत. 

लोकेश राहुल(lokesh rahul)

तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल आहे. त्याचा संघ सध्या चांगली कामगिरी करत नाहीये मात्र या फलंदाजाने सातत्याने धावा केल्या आहेत. ६ सामन्यात त्याने ९१ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. यासोबतच त्याने २४० धावा केल्या आहेत. 

ग्लेन मॅक्सवेल(glenn maxwell)

या लिस्टमध्ये या हंगामाच्या सुरूवातीला सर्वाधिक चर्चेत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. २ अर्धशतके ठोकताना या फलंदाजाने २२३ धावा केल्या. त्याने या दरम्यान २१ चौकार आणि १० षटकार ठोकले. 

जॉनी बेअरस्ट्रॉ(jonny bairstraw)

पाचव्या स्थानावर सनरायजर्स हैदराबादचा ओपनर जॉनी बेअरस्ट्रॉ आहे. ६ सामन्यांत त्याने ४३च्या सरासरीने २१८ धावा केल्यात. १६ चौकार आणि १४ षटकार याने ठोकले आहेत. ६३ ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी