Playing 11, PBKS vs CSK, IPL 2021, Match-8: पंजाब-चेन्नई यांच्यात टक्कर, जाणून घ्या प्लेईंग ११

IPL 2021
Updated Apr 16, 2021 | 12:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Punjab Kings vs Chennai Super Kings, Dream 11: पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आयपीएल २०२१चा आठवा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी.

PBKS vs CSK,
PBKS vs CSK, IPL 2021, Match-8: पंजाब-चेन्नई यांच्यात टक्कर 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलमधील ८वा सामना
  • चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने
  • जाणून घ्या कोणत्या ११ खेळाडूंना मिळणार संधी

मुंबई:  एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) संघ आयपीएलमधील(IPL) आठव्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध(Punjab Kings) खेळणार आहे.   चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभव पाहावा लागल्याने ते या सामन्याद्वारे विजयी पथावर परतण्याचा प्रयत्न करतील. चेन्नईला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सात विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. धोनीचे धुरंधर शुक्रवारी पंजाबच्या शेरविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन हात करतील. 

पंजाब किंग्स यांनी या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ४ धावांनी मात दिली होती. पंजाब किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि २२१ धावांचा स्कोर केला. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सच्या संघाला २१७ धावा करता आल्या. पंजाब आणि चेन्नई हे दोनही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस होऊ शकतो. १५ एप्रिल २०२१ला जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने असतील तेव्हा विजय हे दोघांसाठी एकच लक्ष्य असेल. दोन्ही संघात स्टार क्रिकेटर असल्याने हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 

पिच आणि परिस्थिती

राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना कमी धावसंख्येचा ठरला. मात्र येथे फलंदाजांनी आपल्या चुकीमुळे विकेट गमावल्या. वानखेडे स्टेडियमवर जे दोन सामने खेळवण्यात आले त्यातून संकेत मिळाले आहेत की येथे फलंदाजाना खुलेपणाने खेळता येईल. बाऊंड्री जास्त लांब नाही. त्यामुळे हा सामना हाय स्कोरिंग होऊ शकतो. 

संभाव्य प्लेईंग ११

सीएसके चे संभाव्य प्लेईंग ११ - रुतुराज गायकवाड़, फाफ डू प्‍लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सॅम करन, ड्वायेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

पीबीकेएस संभाव्य प्लेईंग ११  - केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रवि बिश्‍नोई, मोहम्‍मद शमी, अर्शदीप सिंह. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी