चेन्नई आयपीएलची पहिली फायनलिस्ट!

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 11, 2021 | 01:18 IST

आयपीएल २०२१च्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला. या विजयामुळे चेन्नई यंदाच्या आयपीएलची पहिली फायनलिस्ट टीम झाली.

Chennai Super Kings won by 4 wkts against Delhi Capitals
चेन्नई आयपीएलची पहिली फायनलिस्ट! 

थोडं पण कामाचं

  • चेन्नई आयपीएलची पहिली फायनलिस्ट!
  • चेन्नई चार विकेट राखून जिंकली
  • मॅन ऑफ द मॅच ऋतुराज गायकवाड झाला पण धोनीने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली

दुबईः आयपीएल २०२१च्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला. या विजयामुळे चेन्नई यंदाच्या आयपीएलची पहिली फायनलिस्ट टीम झाली. चेन्नईने फायनल मॅचमध्ये दिमाखात प्रवेश केला. मॅन ऑफ द मॅच ऋतुराज गायकवाड झाला पण धोनीने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. त्याने ३००च्या सरासरीने खेळून बेस्ट फिनिशर असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. Chennai Super Kings won by 4 wkts against Delhi Capitals

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला वीस ओव्हरमध्ये पाच बाद १७२ या धावसंख्येवर रोखले. यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने १९.४ ओव्हरमध्ये सहा बाद १७३ धावा केल्या आणि मॅच चार विकेट राखून जिंकली. 

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ७०, फाफ डू प्लेसिसने १, रॉबिन उथप्पाने ६३, शार्दुल ठाकूरने शून्य, अंबाती रायुडूने (धावचीत) १, मोईन अलीने १६, महेंद्रसिंह धोनीने नाबाद १८ आणि रविंद्र जडेजाने नाबाद शून्य धावा केल्या. धोनीने सहा बॉल खेळून तीन फोर आणि एक सिक्स मारत ३००च्या सरासरीने नाबाद १८ धावांची खेळी केली. दिल्लीकडून टॉम करणने ३ तर एनरिच नॉर्टजे आणि आवेश खानने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून पृथ्वी शॉने ६०, शिखर धवनने ७, श्रेयस अय्यरने १, अक्षर पटेलने १०, रिषभ पंतने नाबाद ५१, शिमरॉन हेटमायरने ३७ आणि टॉम करणने नाबाद शून्य धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेझलवूडने २ तर मोईन अली, रविंद्र जडेजा आणि डीजे ब्राव्हो या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी