IPL 2021: स्पर्धेदरम्यान या गोलंदाजाच्या भावाने केली होती सुसाईड, आता चमकतोय

IPL 2021
Updated Apr 13, 2021 | 17:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2021: या युवा क्रिकेटरे आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले. दरम्यान, या गोलंदाजाची कहाणीही समोर आली आहे.

chetan sakaria
स्पर्धेदरम्यान या गोलंदाजाच्या भावाने केली होती सुसाईड 

थोडं पण कामाचं

  • या क्रिकेटरने आपल्या चमकदार कामगिरीने साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले.
  • अनेक दिग्गज गोलंदाजाच्या उपस्थितीत चेतन सकारियाने चांगली कामगिरी केली.
  • आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील पहिला सामना जबरदस्त राहिला.

मुंबई:  राजस्थान रॉयल्स(rajasthan royals)ला इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी पंजाब किंग्सच्या हातून पराभव पत्करावा लागला. सामन्यात राजस्थान रॉयल्सचा असा एक खेळाडू होता ज्याचे हे आयपीएलमधील पदार्पण होते. या क्रिकेटरने आपल्या चमकदार कामगिरीने साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले. दरम्यान, या गोलंदाजाची कहाणीही समोर आली आहे. 

यो गोलंदाजाने कठीण पार्श्वभूमी असतानाही ना केवळ लीगमध्ये जागा मिळवली तर विरोधी संघाच्या विकेटही घेतल्या तसेच सुरूवातीपासूनच दबाव कायम राखला. आम्ही बोलतोय राजस्था रॉयल्सचा गोलंदाज चेतन सकारियाबद्दल. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून त्याने पदार्पण केले. 

स्पर्धेदरम्यान चेतनच्या भावाने केली होती आत्महत्या

चेतन सकारिया जानेवारी २०२१मध्ये सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळत होता. त्याचवेळेस त्याच्या लहान भावाने घरी आत्महत्या केली होती. त्यावेळी चेतन संघासोबत बायोबबलमध्ये होता. अशातच त्याच्या कुटुंबाने त्याला कोणतीच माहिती दिली नवव्हती. आयपीएल २०२१च्या लिलावात राजस्थान संघात सामील झाल्यानंतर चेतन म्हणाला होता जर त्याचा लहान भाऊ आता असता तर खूप खुश झाला असता.

डावात यशस्वी गोलंदाज ठरला

आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील पहिला सामना जबरदस्त राहिला. या सामन्यात दोन्ही संघानी २०० पेक्षा जास्त धावा केल्या. अनेक दिग्गज गोलंदाजाच्या उपस्थितीत चेतन सकारियाने चांगली कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सच्या या गोलंदाजाने पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत पंजाबच्या दिग्गज फलंदाजांना केवळ धावा बनवण्यापासून रोखले नाही तर यशस्वी गोलंदाज ठरला. 

लिलावात इतक्या रूपयांना केले होते खरेदी

गेल्या लिलावात सौराष्ट्रच्या या गोलंदाजाला राजस्थानने १.२० कोटी रूपयांना खरेदी केले होते. राजस्थानने पहिल्या सामन्यात सकारियावर विश्वास ठेवला आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी