आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर; चेतन सकारियाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

IPL 2021
भरत जाधव
Updated May 09, 2021 | 17:03 IST

राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जलदगती गोलंदाज चेतन सकारियाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या खेळाडूला पितृशोक झाला आहे.

Chetan Sakaria's father dies due to corona
क्रिकेटर चेतन सकारियाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज चेतन सकारियाच्या वडिलांचे निधन
  • कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे निधन
  • चेतन सकारियाला राजस्थान रॉयल्स संघाने १.२० कोटीमध्ये विकत घेतले होते.

भावनगर : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जलदगती गोलंदाज चेतन सकारियाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या खेळाडूला पितृशोक झाला आहे. कोरोना खेळाडूच्या डोक्यावरील पित्याची छाया काढून घेतली आहे. आपली आयपीएलची पूर्ण कमाई वडिलांच्या उपचारासाठी खर्च करण्याची तयारी चेतनने दर्शवली होती. पण निर्दयी कोरोना चेतनला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. 

जलदगती गोलंदाज चेतन सकारियाचे (Chetan Sakariya) वडील कांजीभाई सकारिया (Kanjibhai Sakariya) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भावनगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सकारिया देखील वडिलांची सेवा करण्यासाठी भावनगरमध्ये गेला होता. सकारियाच्या वडिलांच्या निधनाची माहिती राजस्थान रॉयल्सने ट्विट करत याबाबतची दिली आहे.

आयपीएलची कमाई खर्च करण्याची होती तयारी

सकारिया याने दोन दिवसांपूर्वी वडिलांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती.  राजस्थान रॉयल्सकडून मला काही दिवसांपूर्वीच पैसे मिळाले आहेत, हे माझे भाग्य आहे. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये याचा उपयोग होईल." त्यांच्या उपचारासाठी IPL ची सर्व कमाई खर्च करण्याची सकारियाची तयारी होती. "मी माझ्या वडिलांच्या चांगल्या उपचारासाठी क्रिकेट आणि IPL मधून मिळालेले पैसे देत आहे. ही स्पर्धा एक महिना झाली नसती तर माझ्यासाठी खूप अवघड परिस्थिती होती. मी गरीब कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेंपो चालवला आहे. IPL मुळेच आमचे आयुष्य बदलले आहे," असे त्याने सांगितले होते.

राजस्थान संघाने  सकारियाला १.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तो पहिल्या सामन्यापासूनच संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करत होता. 
 चेतन सकारियाने या आयपीएलमधील ७ मॅचमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्याच मॅचमध्ये ३ विकेट्स घेत जोरदार पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना या सारख्या दिग्गज बॅट्समन्सना आऊट केले. पहिल्याच आयपीएलमध्ये त्याने केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दुर्दैवाने त्याच्यावर आयपीएल स्पर्धा स्थगित होताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी