IPL 2022: राशिदच्या धुलाईने मुरलीधरनचा राग अनावर; मैदानातच केली शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

IPL 2022
Updated Apr 28, 2022 | 19:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rashid Khan IPL | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या सलग पाचव्या विजयावर राशिद खानने (Rashid Khan) पाणी टाकले आणि हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.

 Coach muttiah muralitharan gets angry after losing the match
राशिदच्या धुलाईने प्रशिक्षकाचा राग अनावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • गुजरातच्या संघाला शेवटच्या षटकांमध्ये विजयासाठी २२ धावांती आवश्यकता होती.
  • राशिद खानने तीन षटकार ठोकून हैदराबादकडून विजय खेचून आणला.

Rashid Khan IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा (IPL 2022) थरार रंगला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) सलग पाचव्या विजयावर राशिद खानने (Rashid Khan) पाणी टाकले आणि हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. राशिद खान आणि राहुल तेवतिया यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला. राशिदच्या निर्णायक खेळीच्या बदल्यात गुजरातने ५ गडी राखून हैदराबादवर मात केली. (Coach muttiah muralitharan gets angry after losing the match). 

लक्षणीय बाब म्हणजे गुजरातच्या संघाला शेवटच्या षटकांमध्ये विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. दरम्यान राशिद खानने ३ षटकार ठोकून विजयी खेळी केली. हैदराबादच्या विजयी रथाला रोखण्यात गुजरातच्या संघाला यश आले मात्र हैदराबादच्या संघाच्या तोंडातून घास पळवल्याने प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनचा राग अनावर झाला. कारण हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून देखील विजय पदरात पडला नाही. 

अधिक वाचा : छेडछाड प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीला अद्याप दिलासा नाही


मुरलीधरन यांचा राग अनावर 

आरसीबीविरूद्धच्या सामन्यात यानसने जसे विराट कोहलीला तंबूत पाठवले होते त्याच पद्धतीने तो आजही खेळी करेल या हेतूने संघाने यानसला शेवटचे षटक दिले होते. मात्र या षटकात त्याला चांगलाच मार पडला. लक्षणीय बाब म्हणजे फलंदाजाला बाद करण्याऐवजी त्याने एका षटकात तब्बल २५ धावा दिल्या. या सामन्यानंतर हैदराबादच्या संघाचा प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या तोंडातून अपशब्दही निघाल्याची चर्चा आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रशिक्षकाने असे वागणे शोभते का असा प्रश्न सोशल मीडियावरील युजर्स विचारत आहेत. दरम्यान मुरलीधरन यांचा हा व्हिडिओ सामना संपल्यानंतर चांगलाच चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी