आयपीएल 2022 वर कोरोनाचं संकट; दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोरोनाच्या विळख्यात, संपूर्ण टीम क्वारंटाईन

IPL 2022
भरत जाधव
Updated Apr 18, 2022 | 13:56 IST

डियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या  15 व्या हंगामात कोरोना (Corona ) व्हायरसचा (Virus) शिरकाव झाला आहे. दिल्ली संघाच्या (Delhi team)फिजिओनंतर एका खेळाडूचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दिल्ली संघाला पुण्याला रोखण्यात आले असून संपूर्ण टीमला मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

Delhi Capitals team Two player's corona test positive
दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोरोनाच्या विळख्यात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गेल्या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती.
  • कोरोनामुळे मागील वर्षी आयपीएल केवळ 29 सामन्यांनंतर थांबवण्यात आले होते.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या  15 व्या हंगामात कोरोना (Corona ) व्हायरसचा (Virus) शिरकाव झाला आहे. दिल्ली संघाच्या (Delhi team)फिजिओनंतर एका खेळाडूचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दिल्ली संघाला पुण्याला रोखण्यात आले असून संपूर्ण टीमला मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. पण रॅपिड टेस्टमध्ये या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दिल्ली संघाची पुढील मॅच 20 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. दिल्लीचा संघ आज सोमवारी मुंबईतून पुण्यासाठी रवाना होणार होता. पण आता हा प्रवास स्थगित करण्यात आला आहे. 

खरं तर, 16 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मात्र, त्यांच्याशिवाय कोणत्याही खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. त्यानंतर 16 एप्रिलला दिल्लीचा संघ बंगळुरूविरुद्ध मैदानात उतरला होता.

दरम्यान दिल्ली संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने बीसीसीआयने दिल्ली संघाला सामना झाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले होते. कोरोनाचा क्रिकेटवर जास्त प्रभाव पडला आहे. आता आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती. तेव्हा न झालेली कसोटी आता जुलै २०२२ मध्ये होणार आहे.

सामन्यात खेळाडूंना हस्तांदोलन करण्यापासून मज्जाव

दिल्ली कॅपिटल्सच्या फिजिओची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून 16 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना एकमेकांना मिठी मारण्यास आणि हस्तांदोलन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते.

गेल्या हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं सामने झाले होतं रद्द 

गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात 3 दिवसांत 3 संघांचे 4 खेळाडू, 2 प्रशिक्षक आणि 2 इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल केवळ 29 सामन्यांनंतर थांबवण्यात आले होते. नंतर, आयपीएलचे उर्वरित 31 सामने ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी