IPL 2022: परदेशात नव्हे तर भारतात घडलेय हे...स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान कपलने केले KISS!मीम्स व्हायरल

IPL 2022
Updated Apr 05, 2022 | 18:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

सामन्यात टॉस हरत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने ६ बाद १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला ९ बाद १५७ धावा करता आल्या. 

kiss
IPL 2022: स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान कपलने केले KISS! 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२मध्ये गुजरातने दिल्लीला हरवले
  • सामन्यात एक कपल किस करताना दिसले

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या(ipl 2022) हंगामात नव्याने सामील झालेला संघ गुजरात टायटन्सने(gujrat titans) सलग दुसरा सामना जिंकला आहे. त्यांनी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) १४धावांनी हरवले. दिल्ली संघाचा या हंगामातील दोन सामन्यांमधील पहिला पराभव आहे. couple kiss during ipl match 2022 

सामन्यात शुभमन गिल, मोहम्मद शमी, रशीद खान आणि लौकी फर्ग्युसन यांचा जलवा पाहायला मिळाला. मात्र संपूर्ण ध्यान दुसऱ्या एकाच गोष्टीने खेचून घेतले. खरंतर, या सामन्यादरम्यान एक कपल किंसिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाले. याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

किसिंग करताना कपलचा फोटो व्हायरल

आयपीएलमध्ये कॅमेरामन मैदानावर सुरू असलेला खेळ रेकॉर्ड करण्याशिवाय आपल्या नजरा इकडे तिकडे फिरवत असतो. या दरम्यान जी काही गोष्ट कॅमेऱ्यात कैद होते ती पाहता पाहता व्हायरल होते. आतापर्यंत मिस्ट्री गर्ल सर्वाधिक व्हायरल झाली होती. आता किंसिंग करताना कपलचा फोटो व्हायरल झाला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. 

 

मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है

सोशल मीडियावर या कपलचा फोटो शेअर होताच विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका युजरने लिहिले, हे कपल आयपीएल सामन्यांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. एका अन्य युझरने लिहिले, मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है. एका अन्य युझरने लिहिले, एका कपलला आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांना सपोर्ट केले पाहिजे त्यामुळे त्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी अशी संधी मिळत राहील. 

गुजरातने दिल्लीला हरवले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनुसार कपल्या किसिंग कऱण्याची घटना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या चौथ्या ओव्हरच्या संपल्यानंतर घडली. तेव्हापर्यंत दिल्लीने एक विकेट गमाव ३२ धावा केल्या होत्या त्यावेळेस पृथ्वी शॉ आणि मंदीप सिंह क्रीझवर होते. सामन्यात टॉस हरत पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सने ६ बाद १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ ९ बाद १५७वर आटोपला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी