आयपीएलमध्ये का दिसत आहेत दोन टोपी घातलेले क्रिकेटर, काय आहे याचे कारण...

IPL 2020
Updated Oct 26, 2020 | 18:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2020: तुम्ही जर आयपीएल पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट ध्यानात आली आहे का की आयपीएल २०२०दरम्यान अनेक क्रिकेट दोन टोप्या घातलेले पाहायला मिळत आहेत. याचे कारण घ्या जाणून...

ipl 2020
आयपीएलमध्ये का दिसत आहेत दोन टोपी घातलेले क्रिकेटर 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२०मध्ये खेळाडू हा घालत आहेत डबल कॅप
  • जाणून घ्या यामागचे कारण
  • आयपीएलआधी सीपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही घडलेय हे 

मुंबई: यूएईमध्ये(uae) सुरू असलेल्या आयपीएल २०२०(ipl 2020)मध्ये आतापर्यंत ४० सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान टीव्ही सामन्याचा आनंद घेणाऱ्या क्रिकेट प्रेमींची नजर अनेकदा खेळाडूंच्या डोक्यावर येऊन थांबते याचे कारण म्हणजे खेळाडूंनी घातलेली डबल कॅप(double cap). साधारणपणे प्रत्येक सामन्यात हे पाहायला मिळत आहे मात्र त्यानंतर अनेकांना यामागचे कारण अद्याप लक्षात आलेले नाही. 

खरं कारण म्हणजे खेळाडू मैदानावर एक कॅपपेक्षा अधिक कॅप घालून येत आहे याचे कारण आयसीसीचे नियम. कोरोना व्हायरसने खेळ आणि आपले सारे आयुष्यच बदलून गेलेआहे. यातीलच हा एक बदल. कोरोना व्हायरस महामारी आल्यानंतर आयीसीसीने खेळाडूंना संक्रमित होण्यापासून वाचवण्यासाठी लाळेच्या वापरावरील बंदीसह मैदानावरील अनेक गोष्टींवर बंदी आणली होती. यातील आणखी एक म्हणजे खेळाडूंच्या डोक्यावर एकापेक्षा अधिक टोपी. याचे कारण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. 

मात्र हळू हळू स्पष्ट होतंय की कोरोना व्हायरसमुळे काही गोष्टी बदलल्या आहेत. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार मैदानावर खेळाडू आणि अंपायर्सना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. यातच खेळाडू आपली कोणतीही गोष्ट जसे टोपी, स्वेटर, चश्मा या वस्तू अंपयर्सच्या हातात देऊ शत नाही. यातच अंपायर्सना बॉल हाताळताना ग्लव्हज घालण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. यातच खेळाडू दोन टोप्या घालून त्यांचे सामान सांभाळू शकतात. 

कोरोना येण्याच्याआधी गोलंदाजी सुरू करण्याआधी क्रिकेटर आपली टोपी, चश्मा आणि स्वेटरसारख्या वस्तू अंपायरकडे दत असता मात्र आता असे करू शकत नाही. जर खेळाडू सतत आपल्या वस्तू ठेवण्यासाठी मैदानाबाहेर जाईल तर त्यामुळे त्याचाच त्रास वाढेल. अशातच मराठीत एक म्हण आहे की गरज ही शोधाची जननी आहे. 

कोरोना काळात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरिजदरमम्यान कॅरेबियन क्रिकेटर खासकरून रहकीम कॉर्नवाल स्लिपवर फिल्डिंग करताना पाच कॅप घातलेला दिसला होता. तर कॉर्नवाल सीपीएल २०२०मध्ये दोन टोप्या घालून चर्चेत आला होता मात्र आता हे चित्र आयपीएलमध्येही दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी