CSKसोबत IPLमध्ये पहिल्यांदा इतके वाईट घडले असेल...संघाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

IPL 2022
Updated May 16, 2022 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chennai Super Kings:प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झालेला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ७ विकेटनी हार पत्करावी लागली. या हंगामातील चेन्नईचा हा ९वा पराभव आहे. 

chennai super kings
CSKसोबत IPLमध्ये पहिल्यांदा घडले असे... 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२च्या ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सला ७ विकेटनी हरवले.
  • आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा हा ९वा पराभव होतता.
  • आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ससोबत पहिल्यांदा असे घडले की त्यांनी एकाच हंगामात ९ सामने गमावले होते.

मुंबई: आयपीएलच्या(Ipl) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings). मात्र या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची स्थिती खूपच वाईट आहे. चेन्नई सुपर किंग्सला या हंगामात ९व्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे चेन्नईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून(play off race) बाहेर गेला आहे. रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) खेळवल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर संघाच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. csk loose 9 match in season first time in ipl history

अधिक वाचा - आसाममधील पुरामुळे 7 जिल्ह्यांतील सुमारे 57,000 लोक प्रभावित

CSKने बनवला लाजिरवाणा रेकॉर्ड

आयपीएल २०२२च्या ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सला ७ विकेटनी हरवले. आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा हा ९वा पराभव होतता. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ससोबत पहिल्यांदा असे घडले की त्यांनी एकाच हंगामात ९ सामने गमावले होते. २००८ सालापासून चेन्नईचा संघ आयपीएलचा भाग आहे. मात्र या हंगामात संघाची स्थिती खूपच वाईट झाली आहे. असे याआधी कधीच घडले नव्हते. 

असा होता सामना

गुजरात टाइटंस (Gujarat Titans) विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावताना १३३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १९.१ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावताना १३ धावा करत ७ विकेटनी सामना आपल्या नावे केला. याआधीही खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर गुजरातने चेन्नईला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये टॉप४मध्ये स्थान पक्के केले आहे. 

अधिक वाचा - उन्हाळी सुट्ट्यांमधील पर्यटनाचे ट्रेंड...तुम्ही कधी निघतांय?

चेन्नई-मुंबईची एकच स्थिती

चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात आतापर्यंत १३ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ९ सामन्यांत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आयपीएल २०२२च्या पॉईंट्स टेबलमध्ये सीएसकेचा संघ ९व्या स्थानावर आहे. आयपीलमध्ये सर्वाधिक वेळा खिताब जिंकणाऱ्या मुंबई संघाचेही असेच हाल आहेत त्यांनीही या हंगामातील १२ सामन्यांपैकी ९ सामनेगमावलेत. मुंबई इंडियन्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचे आणखी २ सामने आहेत. तर चेन्नईचा एक सामना बाकी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी