मुंबई: टीम इंडिया(Team India) आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी(Chennai Super Kings) एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर, दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आयपीएल २०२२चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही आहे. याशिवाय या वर्षी ऑक्टोबर-नोव्हंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्येही खेळणे या खेळाडूचे कठीण वाटते.
अधिक वाचा - इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात
टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार दीपक चाहर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२२ आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नाही. दीपक चाहरचे नसणे या वर्षी चेन्नई सुपर किंग्सला नक्कीच जाणवेल. दीपक चाहर टी-२०वर्ल्डकपमध्ये न खेळण्याने टीम इंडियासाठी हा मोठा झटका असेल.
दीपक चाहर या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. दीपक चाहरचे स्नायू खेचले गेलेत. दीपक चाहर बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या दुखापतीतून सावरत आहे मात्र त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले आहे. चाहर पाठीच्या दुखापतीमुळे कमीत कमी चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाही आहे.
अधिक वाचा - जंगलात शिकारीला गेलेल्या चौघांनी घोरपडीवर केला रेप
दीपक चाहर पहिल्या दुखापतीतून सावरण्यासाठी नेट्सवर गोलंदाजी करत होता. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. दीपक चाहरला आयपीएल २०२२च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटींची भरभक्कम रक्कम देत खरेदी केले होते. दीपक चाहर सुरूवातीला प्रतिस्पर्धी संघावर दबाव बनवण्यात माहीर आहे. दीपक चाहर नव्या बॉलने विकेट घेण्यास सक्षम आहे. दीपक चाहरने आयपीएलच्या ६३ सामन्यांमध्ये आतापर्यंत ५९ विकेट घेतल्या आहेत.