गंभीर दुखापतीने त्रस्त आहे CSKचा जुना खेळाडू, ५ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून गायब

IPL 2022
Updated Mar 31, 2022 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

हा स्टार क्रिकेटर साधारण ५ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. पाठीच्या दुखण्यातून सावरत असलेला इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम कुरेनने सांगितले की इंडियन प्रीमियर लीगच्या या सत्रात न खेळू शकल्याने निराश आहे. मात्र त्याला वाटते की लिलावातून मागे हटण्याचा त्याचा निर्णय योग्य होता. 

csk
५ महिन्यांपासून क्रिकेटपासून गायब आहे CSKचा जुना खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • करिअरमध्ये गंभीर दुखापतीने त्रस्त आहे हा सीएसकेचा जुना खेळाडू
  • पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले
  • ५ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानातून आहे गायब

मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी(chennai super kings) महेंद्रसिंग धोनीच्या(ms dhoni) नेतृत्वात २ वर्षांपर्यंत आयपीएल खेळलेला एक खेळाडू आपल्या करिअरमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. हा स्टार क्रिकेटर साधारण ५ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. पाठीच्या दुखण्यातून सावरलेला इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम कुरेनने(Sam Curran)सांगितले की तो इंडियन प्रीमियर लीगच्या या सत्रात न खेळू शकत असल्याने निराश आहे. मात्र त्याला वाटते की लिलावातून बाहेर पडण्याचा त्याचा निर्णय योग्य नव्हता. 

अधिक वाचा - तरुणीने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेच्या नेत्यावर केले गंभीर आर

करिअरच्या गंभीर दुखापतीने त्रस्त झालाय हा खेळाडू

सॅम कुरेनने सांगितले की आयपीएलमध्ये त्याचे पुनरागमन हे खूप घाईचेअसेल कारण सध्या तो दुखापतीने त्रस्त आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळलेल्या कुरेनने ईएसपीएनक्रिकइंफोला सांगितले की मी निराश आहे की मी खेळू शकत नाही. घरात बसून आयपीएल बघणे निराशाजनक आहे. 

अधिक वाचा - 'एप्रिल फूल'निमित्त मस्करी करण्याच्या या आहेत भन्नाट आयडिया

पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले

सॅम कुरेनने सांगितले, मला लिलावात सामील व्हायचे होते, मात्र अखेरीस नाही केले. मला वाटते हा माझा योग्य निर्णय होता. मागे वळून पाहिले तर आयपीएलमध्ये खेळणे थोडे घाईचे ठरले असते. मध्यम गतीच्या २३ वर्षीय गोलंदाजाला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. 

पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव

आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर 6 गडी राखून विजय मिळवला. केकेआरने या मोसमाची सुरुवात विजयाने केली. कोलकाताकडून अजिंक्य रहाणे आणि सॅम बिलिंग्सने महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रहाणेने संघाकडून 44 धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १८.३ षटकांत सामना जिंकला. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होने सीएसकेकडून शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी