IPL 2022: गुजरातला जिंकवणाऱ्या मिलरला आधी कोणी नव्हते घेतले विकत, मग..

IPL 2022
Updated May 25, 2022 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरला कोणी खरेदी केले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सने बोली लावली होती. 

david miller
गुजरातला जिंकवणाऱ्या मिलरला आधी कोणी नव्हते घेतले विकत, मग. 
थोडं पण कामाचं
  • गुजरात टायटन्सने शेवटची बोली ३ कोटी रूपयांवर लावली मात्र यानंतर राजस्थान रॉयल्सने पुढे बोली लावण्याचा प्रयत्न केला नाही
  • पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या डेविड मिलरला चक्क ३ कोटींना गुजरातने आपल्या संघात घेतले.

मुंबई: आयपीएल २०२२च्या(ipl 2022) क्वालिफायर १मध्ये गुजरात टायटन्सला(gujrat titans) विजय मिळवून फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरवर(david miller) सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र तुम्हाला माहीत आहे का या डेविड मिलरला आयपीएलच्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणी खरेदीदार मिळाला नव्हता. लिलावाच्या पहिल्या दिवशी डेविड मिलरमध्ये कोणत्या संघाने रस दाखवला नव्हता. इतकं की त्याची जुनी फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सनेही पहिल्या दिवशी त्याच्यावर बोली लावली नव्हती. David miller was unsold at first day of ipl 2022 auction

अधिक वाचा - Weight Gain: या फळांच्या सेवनाने वाढेल तुमचे वजन

लिलावाच्या पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या तसेच एक कोटींची बेस प्राईज असलेल्या डेविड मिलरने विचारही केला नसेल की दुसऱ्या दिवशी इतक्या मोठ्या किंमतील त्याला विकत घेतले जाईल. दुसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर बोली लावण्यास सुरूवात केली होती मात्र राजस्थानने जसे डेविड मिलरवर रस दाखवला तसे गुजरात टायटन्सने बोली लावण्यास सुरूवात केली. ही बोली ३ कोटींपर्यंत पोहोचली. 

गुजरात टायटन्सने शेवटची बोली ३ कोटी रूपयांवर लावली मात्र यानंतर राजस्थान रॉयल्सने पुढे बोली लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या डेविड मिलरला चक्क ३ कोटींना गुजरातने आपल्या संघात घेतले. गुजरात टायटन्सच्या मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि प्रत्येक सामन्यात त्याला संधी दिली. त्यानेही या संधीचा फायदा घेला आणि संघाला अनेक सामने जिंकून दिले. यातील सगळ्यात खास सामना म्हणजे क्वालिफायर १चा होता. यात त्याने ३८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. 

डावखुरा फलंदाज डेविड मिलरने १५ सामन्यांत आतापर्यंत ४४९ धावा केल्या आहेत आणि तो गुजरातचा या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ६४ पेक्षा जास्त आणि १४१पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने या हंगामात धावा केल्यात. त्याने आतापर्यंत २९ चौकार आणि २२ षटकार ठोकलेत. 

अधिक वाचा -अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी न मिळाल्याने सचिन म्हणाला.

 गुजरातचा राजस्थानवर विजय 

गुजरातने मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानविरुद्ध ७ विकेटनी विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गुजरातने ३ विकेट देत पूर्ण केले. राजस्थानने मोठे आव्हान देऊनही डेविड मिलर आणि हार्दिक पांड्यासमोर त्यांना गुडघे टेकावे लागले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची नाबाद भागीदारी केली. मिलरने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या तर कर्णधार पांड्याने २७ बॉलमध्ये ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ४० धावांची खेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी