David Warnar: थर्ड अंपायरने दिले आऊट, मुलींना अश्रू अनावर

IPL 2022
Updated Apr 18, 2022 | 11:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

अंपायरच्या रिव्ह्यूनंतर जेव्हा पाहिले तेव्हा बॉल स्टम्पवर लागला होता आणि लेग स्टंप हिट करत होता. पहिल्यांदा वाटले की अंपायर कॉल असेल आणि वॉर्नरला नॉट आऊट करार दिला जाईल. 

David Warnar
David Warnar: थर्ड अंपायरने दिले आऊट, मुलींना अश्रू अनावर 
थोडं पण कामाचं
  • वॉर्नरने आरसीबीविरुद्ध त्याने २९ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
  • या खेळाडूमध्ये एकट्याच्या जीवावर सामना जिंकण्याची क्षमता आहे.
  • दिल्ली कॅपिटल्ससोबतही असेच काहीसे घडले. वॉर्नर आपल्या फॉर्ममध्ये होता.

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा(delhi capitas) सलामीचा फलंदाज डेविड वॉर्नर(david warner) शनिवारी आपल्या रंगात दिसला. वॉर्नरने आरसीबीविरुद्ध त्याने २९ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. संपूर्ण जगाला माहीत आहे की ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू जर एकदा क्रीझवर टिकला तर समोरच्या संघाचे काही खरे नाही. या खेळाडूमध्ये एकट्याच्या जीवावर सामना जिंकण्याची क्षमता आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबतही असेच काहीसे घडले. वॉर्नर आपल्या फॉर्ममध्ये होता. मोठे मोठे शॉट्स खेळत होता. मात्र त्यासच्यासाठीही दिनेश कार्तिक काळ बनला. जसे वॉर्नर बाद झाला त्याच्या तीनही मुली उदास झाल्या. david warner start crying after umpire gives out 

अधिक वाचा - क्रूझवर बिकिनीमध्ये दिसली सनी लिओनी

वॉर्नरने पूर्ण केले ५२वे अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात वॉर्नरने केवळ २९ चेंडूत आयपीएलमध्ये आपले ५२वे अर्धशतक पूर्ण केले. मिचेल मार्श धावा करण्यासाठी संघर्ष करत होता. अशातच जेव्हा रनरेट वाढत होता तेव्हा वॉर्नरने हर्षल पटेलवर सिक्स ठोकला आणि फोर मापला मात्र वानिंदु हसरंगाच्या बॉलवर स्विट हिट लगावण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. वॉर्नर धोकादायक वळणावर होता. त्या वेळेस आरसीबीला त्याच्या विकेटची गरज होती. हसरंगा एलबीडब्लूबाबत कन्फर्म नव्हता त्याने अपील केले मात्र अंपायरने नॉट आऊट करार दिला. मात्र दिनेश कार्तिकने सांगितले की रिव्ह्यूा वापर करायला हवा.

दिनेश कार्तिकने घेतला होता डीआऱएस

अंपायरच्या रिव्ह्यूमध्ये पाहिले तर बॉल स्टम्पवर लागला होता आणि लेग स्टम्प हिट करत होता. पहिल्यांदा वाटले की अंपायर कॉल असेल आणि वॉर्नरला नॉटआऊट दिले जाईल. मात्र थर्ड अंपायरने त्याला नॉटआऊट घोषित केले. यानंतर कॅमेऱ्याची नजर त्याच्या तीन मुलींवर पडली. तेव्हा त्या खूप निराश दिसत होत्या. त्याची एक मुलगी तर रडायला लागली. वॉर्नरला तीन मुली आहेत आणि सोशल मीडियावर त्या नेहमी अॅक्टिव्ह असतात. तो आपल्या तीन मुलींसह खूप पोस्ट टाकत असतात. 

अधिक वाचा - शुक्र देव लवकरच करणार राशीपरिवर्तन, तीन राशींवर होणार प्रभाव

हसरंगाने घेतली होती वॉर्नरची विकेट

पंत जेव्हा दोन धावांवर खेळत होता तेव्हा हसरंगाने त्याचा कठीण कॅच सोडला मात्र मार्शच्या संघर्षपूर्ण डाव लवकरच संपला तर रॉमन पॉवेल खातेही खोलू शकला नाही तर ललित यादव हेझलवूडच्या या ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी