DC vs KXIP: रोमांचक सामन्यात किंग्ज इलेवनपेक्षा 'सुपर' ठरली दिल्ली कॅपिटल्स, जबड्यातून खेचून आणला विजय

IPL 2020
प्रशांत जाधव
Updated Sep 21, 2020 | 08:54 IST

Delhi Capitals vs Kings XI Punjab IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेवन पंजाब विरुद्ध एक रोमांचक विजय मिळवला आहे. दिल्लीने पंजाबला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. 

dc vs kxip match report in marathi delhi capitals defeats kings xi punjab in super over
दिल्लीचा पंजाबवर सुपर विजय  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दिल्लीने पंजाबला सुपर ओव्हरमध्ये दिली मात 
  • दोन्ही संघात अत्यंत चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला
  • दोन्ही संघाचा या सिझनचा पहिला सामना होता. 

दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दिल्लीने विजय मिळवला. दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीवर आल्यावर मॅचचा निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून झाला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. दिल्लीने २० षटात आठ विकेटच्या बदल्यात १५७ धावा केल्या होत्या त्याला उत्तर देताना पंजाबने आठ विकेट गमावून १५७ च धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने केवळ दोनच धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने ३ धावा करून सहज विजय आपल्या खिशात घातला. 


दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली राहिली नाही 

टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीच्या संघाची चांगली सुरूवात राहिली नाही. सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुसऱ्या षटकात शून्यावर रन आऊट झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ ५ धावांवर चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीचा शिकार बनला. दोन विकेट पडल्यावर संघाला शेमरॉन हेटमायरकडून खूप अपेक्षा होत्या पण तो ७ धावा कडून चौथ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर (३९) आणि ऋषभ पंत (३१ ) मोर्चा सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. पण ८७ धावा बोर्डवर असताना दोघांनी विकेट गमावली. 

स्टॉइनेसने दिल्लीला वाचवले

पाच विकेट गमावल्यावर दिल्लीचा संघ १२० धावा करेल असेल वाटत होते. पण मार्कस स्टॉइनस याने दमदार खेळी करत टीममध्ये उत्साह भरला. त्याने २१ चेंडूत ५३ धावांची शानदार खेळी केली. त्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.  पंजाबकडून मोहम्मद शमी आणि शेन कॉट्रेल याने दोन आणि रवि बिश्नोई यांनी एक विकेट घेतली. 

पंजाबची मधली फळी नाही चालली 

लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेवन पंजाबने चांगली सुरूवात केली. पंजाबकडून डावाची सुरूवात करणाऱ्या केएल राहुल २१ धाा तर मयंक अग्रवाल याने ८९ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागिदारी केली. पंजाबला पहिला झटका राहुलच्या रुपाने बसला. पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहित शर्माने त्याला आपला बळी बनवला. राहुलनंतर पंजाबने ५ धावांच्या बदल्यात ३ आणखी धावा गमावल्या. करूण नायर १, निकोलस पूरन ०, आणि ग्लेन मॅक्सवेल १ धाव करून पॅव्हेलियनला परतला. सरफराज खान काही काळ टिकून १२ धावा केल्या. पण तो १० व्या षटकात बाद झाला. 

पंजाबचा अर्धा संघ ५५ धावांमध्ये तंबूत परतला. पण दुसऱ्या बाजून मयंक अग्रवालाने मोर्चा सांभाळला होता. त्याला कृष्णप्पा गौतम याने २० धावा करून चांगली साथ दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. 

स्टॉइनसने अखेरच्या ओव्हरमध्ये घेतल्या २ विकेट 

वाटत होते पंजाबचा संघ विजय होईल पण मार्कस स्टॉइनसने अखेरच्या ओव्हरमध्ये  क्रिस जॉर्डनचा आणि मयांक अग्रवालची विकेट घेऊन बाजी पलटून टाकली. पंजाबला अखेरच्या ६ षटकात १३ धावांची गरज होती. पण ते १२ धावाच बनवू शकले. 

सामना सुपर ओव्हरमध्ये 

दोन्ही संघाच्या धावा सारख्या झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पण पंजाबचा संघ केवळ दोन धावा करू शकला. त्यामुळे दिल्लीने सामना अत्यंत सहज जिंकला. स्टॉइनसला त्याच ओव्हर ऑल कामगिरीमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 

दिल्लीकडू कगिसो रबाडा, आर. अश्विन आणि स्टॉइन यांनी दोन - दोन विकेट पटकावल्या. तर अक्षर पटेल  आणि एनरिक नॉर्टज यांना एक-एक विकेट मिळाली. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी