DC vs MI IPL 2020 Final: आयपीएलची फायनल कुठे आणि केव्हा पाहाल?

DC vs MI IPL 2020 Final: IPL २०२०चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. जाणून घ्या आपल्याला हा सामना कुठे आणि कधी पाहता येणार आहे.

DC vs MI IPL 2020 Final
IPL २०२०चा अंतिम सामना आज रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे.  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • दुबईत सुरू असलेल्या IPL २०२०चा अंतिम सामना आज रंगणार आहे.
  • मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे.
  • IPL मधील युवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी कर्णधार रोहित शर्मा यांमध्ये यावर्षीच्या IPLचा अंतिम सामना रंगणार आहे.

शारजा: IPL २०२०चा अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. क्वालिफायर १ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्सने थेट फायनलमध्ये धडक मारली तर एलिमिनेटरमधून जिंकून आलेल्या संरायझर्स हैदराबादला क्वालिफायर २ मध्ये हरवून दिल्ली कॅपिटल्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (DC vs MI IPL 2020 Final) 

IPL मधील युवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी कर्णधार रोहित शर्मा यांच्यात यावर्षीच्या IPLचा अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईने आतापर्यंत रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली ४ वेळा IPL स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पण दिल्लीने आत्तापर्यंत एकदाही IPL स्पर्धा जिंकली नाही. गतविजेत्या मुंबईला पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकता येईल का, तर दिल्लीला आपले पहिलेवहिले IPL विजेतेपद मिळवता येईल का, ही या अंतिम सामन्याची रंजकता असेल.

कधी आणि कुठे खेळवला जाईल MI विरुद्ध DC आयपीएलचा अंतिम सामना?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स मधील IPL २०२०चा अंतिम सामना मंगळवारी म्हणजेच १० नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. 

भारतामध्ये IPL २०२०चा अंतिम सामना किती वाजता प्रक्षेपित होणार?

भारतीय प्रमाणवेळेनुसार IPL २०२०च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. 

IPL २०२०चा अंतिम सामना कुठल्या चॅनलवर पाहता येईल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा IPL २०२० चा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सगळ्या चॅनेल्सवरून प्रसारित होईल. तुम्ही या सामन्याची लाइव्ह कॉमेंटरी हिंदी आणि इंग्लिश भाषेमधून ऐकू शकता. सामन्याबद्दलचे ऑनलाईन अपडेट्स, स्कोअरकार्ड आणि इतर माहितीसाठी तुम्ही आमचे IPL 2020 पेज ला भेट देऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी