कोहलीविषयी डीव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी

IPL 2022
रोहन जुवेकर
Updated Mar 31, 2022 | 00:35 IST

De Villiers big prediction about Kohli : पंधराव्या आयपीएलमध्येही विराट कोहली छान कामगिरी करेल, असा विश्वास एबी डीव्हिलिअर्सने व्यक्त केला.

De Villiers big prediction about Kohli
कोहलीविषयी डीव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी 
थोडं पण कामाचं
  • कोहलीविषयी डीव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी
  • पंधराव्या आयपीएलमध्ये विराट कोहली छान कामगिरी करेल - एबी डीव्हिलिअर्स
  • कोहली सुरू असलेल्या पंधराव्या आयपीएलमध्ये सहाशेपेक्षा जास्त धावा करेल - एबी डीव्हिलिअर्स

De Villiers big prediction about Kohli : मुंबई : क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढउतार अनुभवणारा विराट कोहली सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या टीममधून एक खेळाडू म्हणून खेळत आहे. याआधी त्याने टीमचे नेतृत्व केले होते. सध्या कोहली खेळाडू आहे आणि टीमचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस आहे. वेळोवेळी कोहलीला छान साथ देणारा एबी डीव्हिलिअर्स यंदा आरसीबीच्या टीममध्ये नाही. या सर्व बदलांना सामोरा जात विराट कोहली खेळत आहे. 

बदल स्वीकारणे करणे कठीण आहे. पण हे बदल स्वीकारून सुरू असलेल्या पंधराव्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणे कोहलीसाठी आवश्यक आहे. लवकरच ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेआधी फॉर्मात येणे कोहलीसाठी महत्त्वाचे आहे. या अशा वातावरणात एबी डीव्हिलिअर्सने विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा विराट कोहली हा एक उत्तम फलंदाज आहे. दबावात चांगली कामगिरी करण्याचे सामर्थ्य कोहलीत आहे. याआधी आयपीएलच्या वेगवेगळ्या हंगामात कोहलीने उत्तम कामगिरी केली आहे. आता सुरू असलेल्या पंधराव्या आयपीएलमध्येही विराट कोहली छान कामगिरी करेल, असा विश्वास एबी डीव्हिलिअर्सने व्यक्त केला.

विराट कोहली सुरू असलेल्या पंधराव्या आयपीएलमध्ये सहाशेपेक्षा जास्त धावा करेल; असे एबी डीव्हिलिअर्स म्हणाला. कोहलीने याआधीही आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. विराट कोहलीने २०१६च्या आयपीएलमध्ये सोळा मॅच खेळून चार शतकांसह ९७३ धावा केल्या होत्या. त्यावेळी फायनलमध्ये बंगळुरूचा पराभव झाला होता आणि सनरायझर्स हैदराबादचा विजय झाला होता. पण कोहलीने २०१६च्या आयपीएलमध्ये वैयक्तिक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे कोहलीसाठी आयपीएलच्या एका हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा करणे हे काही कठीण नाही. 

चौदाव्या सीझनमध्ये कॅप्टन आणि फलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत खेळताना कोहलीच्या फलंदाजीवर प्रतिकूल परिणाम झाला होता. यावेळी कोहलीवर कॅप्टन पदाचा दबाव नाही त्यामुळे एक फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कोहलीने पंधराव्या आयपीएलमध्ये पंजाब विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये २९ चेंडूत ४१ धावा केल्या. बंगळुरूने पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये २०६ धावा केल्या. पंजाबने १९व्या ओव्हरमध्ये पाच विकेट राखून विजय मिळवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी