सूर्यकुमार आतून खूप दुखावला गेला आहे :  पोलार्ड 

IPL 2020
प्रशांत जाधव
Updated Oct 29, 2020 | 16:18 IST

पोलार्डलाही वाटते की आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने ज्या पद्धतीची कामगिरी केली ती पाहता त्याची निवड टीम इंडिया व्हायला हवी होती. 

MI captain Kieron Pollard reflects on Suryakumar Yadav's India snub
सूर्यकुमार आतून खूप दुखावला गेला आहे :  पोलार्ड  

थोडं पण कामाचं

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्याच्या दोन दिवसानंतर सूर्यकुमार यादव याने धमाकेदार खेळी केली.
  • सूर्यकुमारने 47 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली. 
  • पोलार्डलाही वाटते की आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने ज्या पद्धतीची कामगिरी केली ती पाहता त्याची निवड टीम इंडिया व्हायला हवी होती. 

दुबई :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्याच्या दोन दिवसानंतर सूर्यकुमार यादव याने धमाकेदार खेळी केली. बंगळुरू विरूद्ध मुंबई इंडियन्सने ५ विकेटने विजय मिळविला. सूर्यकुमारने 47 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली. 

या खेळीनंतर त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही यावरून पुन्हा एकदा चर्चा झडू लागली आहे. विजयानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या किरॉन पोलार्ड याने सांगितले की, सूर्यकुमार आतून खूप दुखावला गेला आहे. पोलार्डलाही वाटते की आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने ज्या पद्धतीची कामगिरी केली ती पाहता त्याची निवड टीम इंडियात व्हायला हवी होती. 

आतल्या-आत तो या गोष्टीने खूप निराश असेल की त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तो आता पूर्वीपेक्षा त्याचा खेळ सुधारत आहे. त्या जोरावर कामगिरी चांगली होत आहे.  त्याने पुन्हा एकदा दाखवले की खेळाडू म्हणून तुम्ही सातत्याने धावा काढत असाल तर त्याचे बक्षिस मिळायला हवे. त्यामुळे योग्य वेळेच्या अगोदर काहीच होत नाही. 

Suryakumar showed Kohli he isn't inferior to anyone: Sehwag

काल झालेल्या सामन्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स विरूद् २० षटकात ६ विकेटच्या बदल्यात १६४ धावसंख्या उभी केली. त्याला उत्तर देताना सूर्यकुमार यादव याने 47 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली आणि मुंबईला सहज विजय मिळवून दिला.  मुंबईने 
19.1 षटकांत 5 गडी राखून आपले लक्ष्य पूर्ण केले. या विजयानंतर मुंबईचे १६ अंक झाले आहे. तसेच प्लेऑफमध्ये पोहचणारी ती पहिली टीम ठरली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी