मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी(chennai super kings) IPL 2022 ची सुरूवात खूपच निराशाजनक झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या ४ही सामन्यांमध्ये पराभव पाहावा लागला. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार गोलंदाज दीपक चाहर(deepak chahar) पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीनंतर दीपक चाहर आयपीएल २०२२च्या पूर्ण स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. deepak chahar can be out of whole ipl 2022 due to injury
अधिक वाचा - आलियाला रचायचं होतं स्वयंवर
चेन्नई सुपर किंग्सने या वर्षी दीपक चाहरला १४ कोटींना खरेदी केले होते. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला अपेक्षा होती की दीपक चाहर फिट होऊन पुन्हा आयपीएलमध्ये परतेल मात्र आता असे कठीण दिसत आहे. दीपक चाहर यावेळेस बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे आणि आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार दीपक चाहरला त्याची जुनी समस्या पुन्हा सतावतेय.
दीपक चाहर या आठवड्याच्या अखेरीस मुंबईमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघात सामील व्हायचे होते. मात्र आता दुखापतीची समस्या समोर आल्यानंतर तो संपूर्ण आयपीएल २०२२मधून बाहेर जाऊ शकतो. दीपक चाहर यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज कोलकातामध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. दीपक चाहरच्या जांघेचे स्नायू खेचले गेले होते.
अधिक वाचा - 'या' कारणामुळे पतीने पत्नीला ५ वर्षापासून ठेवलं डांबून
चेन्नई सुपर किंग्सला दीपक चाहरची मोठी कमतरता जाणवत आहे. दीपक चाहर सुरुवातीलाच विरुद्ध संघाविरुद्ध दबाव बनवण्यात माहीर आहे. दीपक चाहर नव्या बॉलने विकेट घेण्यासही सक्षम आहे.