IPL 2021:दीपक चाहरसाठी लव्हगुरू बनला धोनी, त्याच्या सल्ल्याने बदलला प्रपोजचा प्लान

IPL 2021
Updated Oct 08, 2021 | 17:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni on Deepak Chahar's proposal plan: चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने गुरूवारी पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना सामन्यादरम्यान गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले होते.

ms dhoni
IPL 2021: धोनीच्या सल्ल्याने चाहरने बदलला प्रपोजचा प्लान 

थोडं पण कामाचं

  • दीपक चाहरने गर्लफ्रेंड जयाला प्रपोज केले. 
  • त्याने सामन्यादरम्यान जयाला अंगठी घातली. 
  • चाहरने प्रपोजसाठी धोनीचा सल्ला ऐकला. 

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांनी गुरूवारी आयपीएल २०२१मधील आपला शेवटचा लीग सामना खेळला. पंजाबने हा सामना ६ विकेटनी आपल्या नावे केला. तर चेन्नईने लीगचा हा शेवटचा सामना गमावला. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरसाठी हा सामना नेहमीच खास राहील. चाहरने दुबईच्या मैदानावर सामन्यादरम्यान गर्लफ्रेंड जया भारद्वाजला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. त्याने स्टँड्समध्ये सर्वांसमोर जयाला अंगठी घातली. चेन्नईने १४ सामन्यांत १८ गुणांसह अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. 

दीपकने धोनीच्या सांगण्यावरून आपला प्लान बदलला

दीपकाला आता जयाला प्रपोज करायचे नव्हते. त्याने प्लेऑफच्या सामन्यांमध्ये तिला प्रपोज करण्याचे ठरवले होते. दरम्यान, कॅप्टन कूलच्या सांगण्यावरून त्याने आपला प्लान बदलला. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार चाहरचे वडील लोकेंद्र सिंह चाहरने सांगितले की त्यांचा मुलगा प्लेऑफच्या सामन्यादरम्यान जयाला प्रपोज करणार होता. याबाबत त्याने धोनीला माहिती दिली होती. यानंतर धोनीने चाहरला प्लेऑफच्या मॅचऐवजी लीग सामन्यांतच असे करण्याचा सल्ला दिला. दीपकने पुन्हा कर्णधाराचे म्हणणे ऐकले. 

लोकेंद्र सिंह यांनी मुलाने ज्या प्रकारे गर्लफ्रेंडला प्रपोज केले त्यावर आनंद व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी सांगितले की दीपकने जयाला प्रपोज करण्याची माहिती आधीच कुटुंबाला दिली होती. तर दीपक आणि जयाच्या लग्नाबाबत लवकरच त्यांचे कुटुंबीय बोलणी करणार आहेत. दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दुसरीकडे गोलंदाजाने इन्स्टाग्रामवर जयासोबतचे फोटो शेअर करत लिहिले, खास क्षण. फोटो सगळं काही सांगतात. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी