IPL 2022: वडिलांना नकोसा झाला होता, आईने वाढवले...आज IPLमध्ये कमावतोय नाव

IPL 2022
Updated May 06, 2022 | 16:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

२८ वर्षीय पॉवेलला दिल्ली फ्रेंचायझीने मेगा लिलावात २.८० कोटींना विकत घेतले. वेस्ट इंडिजच्या जमैकामध्ये जन्मलेला हा स्टार प्लेयर भले एकदम स्टार जीवन जगत आहे मात्र त्याने लहानपणी बराच संघर्ष केला

rovman powell
वडिलांना नकोसा झाला होता, आईने वाढवले...IPLमध्ये कमावतोय नाव 
थोडं पण कामाचं
  • दिल्ली संघाचा स्टार प्लेयर पॉवेलने आपली पॉवर दाखवली.
  • त्याने ३५ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. या दरम्यान ६ लांब सिक्स मारले.
  • रॉवमेन पॉवेलचा स्ट्राईक रेट १९१.४३ इतका होता. 

मुंबई: वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर रॉवमेन पॉवेल(rowman powell) सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) आपल्या फलंदाजीने धमाल करतोय. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी(delhi capitals) खेळताना गुरूवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध(sunrisers hyderbad) २१ धावांनी शानदार विजय मिळवून दिला. दिल्ली संघाचा स्टार प्लेयर पॉवेलने आपली पॉवर दाखवली. त्याने ३५ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. या दरम्यान ६ लांब सिक्स मारले. त्याने उमरान मलिक आणि सीन अबॉटची चांगलीच धुलाई केली. रॉवमेन पॉवेलचा स्ट्राईक रेट १९१.४३ इतका होता. Delhi capitals allrounder cricketer rowman powell life story

अधिक वाचा - एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या

२८ वर्षीय पॉवेलला दिल्ली फ्रेंचायझीने मेगा लिलावात २.८० कोटींना विकत घेतले. वेस्ट इंडिजच्या जमैकामध्ये जन्मलेला हा स्टार प्लेयर भले एकदम स्टार जीवन जगत आहे मात्र त्याने लहानपणी बराच संघर्ष केला. त्याची कहाणी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. खरंतर, रॉवमेन आणि त्याच्या बहिणीला आईने वाढवलं आहे. जेव्हा रॉवमेन आईच्या पोटात होता तेव्हा वडिलांनी गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्या आईने नकार दिला आणि मुलाला वाढवले. आज तोच मुलगा आपली आई आणि देशाचे नाव उज्ज्वल करत आहे. 

रॉवमेन आणि त्याच्या बहीणीला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडेही धुतले आहेत. रॉवमेनचा जन्म वेस्ट इंडिजचया जमैकामध्ये बेनिस्टेर डिस्ट्रिक्ट ऑफ ओल्ड हार्बरमध्ये झाला होता. कुटुंबात सिंगल मदर आणि एक छोटी बहीण होती. २०१९मध्ये रॉवमेनने आपल्या आईला कार गिफ्ट केली होती. 

अधिक वाचा - मे २०२२ मधील लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्त

एका मुलाखतीत पॉवेलच्या आईने म्हटले होते की तिचा मुलगा नटखट आहे मात्र तितकाच समजूतदारही आहे. पॉवेलने एकदा सांगितले होते की जेव्हा मी समस्यांा सामना करतो तेव्हा स्वत:ला हेच सांगतो की हे मी माझ्यासाठी नव्हे तर आई आणि बहिणीसाठी करत आहे. हे मी त्यांच्यासाठी करत आहे. त्यांच्यावर माझे खूप प्रेम आहे. रॉवमेन आपल्या आईलाच वडिलांच्या जागी मानतो. 

पॉवेलची कमाल

पॉवेल (Rovman Powell) ने सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सला सांगितले, मी त्याला म्हणजेच पंतला सांगितले की पाचव्या स्थानावर खेळण्यासाठी माझ्यावर विश्वास टाक. मला सुरुवात कऱण्याची संधी. पहिली १५-२० बॉल मला समजून घेऊ देऊ दे. मला अशा पद्धतीची फलंदाजी करायी आहे. पहिल्या २० बॉलमध्ये मी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेन. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी