दिल्ली-पंजाबमध्ये अटीतटीचा सामना, सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने मारली बाजी! 

IPL 2020
रोहित गोळे
Updated Sep 21, 2020 | 01:14 IST

आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरने लागला. यावेळी सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबवर अत्यंत रोमांचक असा विजय मिळवला.

Delhi Capitals
अटीतटीचा सामना, सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने मारली बाजी! (सौजन्य: IPL/BCCI) 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्याचा निकाल लागला सुपर ओव्हरने
  • दिल्ली आणि पंजाबमध्ये अटीतटीची लढत
  • दिल्लीने पंजाबवर सुपर ओव्हरमध्ये मिळवला विजय

दुबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात शनिवारी झाली. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. हा सामना देखील रोमांचक झाला होता आणि पण शेवटच्या षटकात चेन्नईचा विजय मुंबईवर विजय मिळवला. पण रविवारी लीगचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings xi Punjab) यांच्यात खेळला गेला. जो अत्यंत अटीतटीचा झाला. दुबईच्या (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला होता. 

दिल्ली कॅपिटलने आयपीएल 2020 मध्ये रोमांचक सुरुवात केली. दिल्लीचा आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील हा पहिलाच सामना अत्यंत रोमांचक असाच होता. दिल्लीने पंजाबला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. दिल्लीने २० षटकांत ८ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. त्याबरोबर पंजाबच्या संघानेही २० षटकांत ८ गडी गमावून १५७ धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. यावेळी सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाला अवघ्या दोनच धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने बळी न गमावता तीन धावा करून हा सामना आरामात जिंकला.

(सुपर ओव्हर: पंजाब डाव- केएल राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजीसाठी आले)

पहिला चेंडू: कॅगिसो रबाडा पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने दोन धावा काढल्या.

दुसरा चेंडू: दुसर्‍या चेंडूवर केएल राहुल झेलबाद झाला.

तिसरा बॉल: तिसर्‍या चेंडूवर रबाडाने निकोलस पूरणला बोल्ड केलं.

(सुपर ओव्हर: दिल्लीचा डाव रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आले)

पहिला चेंडू: रिषभ पंतने मोहम्मद शमीच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही.

दुसरा बॉल: वाइड 

दुसरा चेंडू: पंतने दुसऱ्या चेंडूवर दोन धावा धावल्या आणि दिल्ली कॅपिटलने हा सामना जिंकला.

दरम्यान, दिल्लीच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीला प्रथम फलंदाजी चाहत्यांची साफ निराशा केली. त्यांचे सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार अय्यर आणि रिषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर मधल्या फळीतील स्टॉयनिसने अवघ्या २१ चेंडूत ५३ धावा करत दिल्लीला १५७ धावांपर्यंत पोहचवलं. मात्र, या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी पंजाबकडून मोहम्मद शमीने ४ ओव्हरमध्ये १५ धावा देत ३ बळी घेतले तर कॉट्रेलने देखील २ बळी घेतले. 

दिल्लीच्या १५७ धावांचा पाठलाग करताना केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात केली. मयांक अग्रवालने ६० चेंडूत ८९ धावा केल्या. पण हे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी देखील टिच्चून गोलंदाजी केली. रबाडा, आर. अश्विन, स्टॉयनिस यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. ज्यामुळे हा सामना अखरेच्या षटकापर्यंत गेला आणि टाय देखील झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये अखेर दिल्लीचं पारडं जड ठरलं आणि पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी