मोदी स्टेडियमवर पृथ्वीच्या झंझावातामुळे जिंकली दिल्ली

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 30, 2021 | 00:57 IST

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २५व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 7 wickets
मोदी स्टेडियमवर पृथ्वीच्या झंझावातामुळे जिंकली दिल्ली 

थोडं पण कामाचं

  • मोदी स्टेडियमवर पृथ्वीच्या झंझावातामुळे जिंकली दिल्ली
  • पृथ्वीला शिखर धवनने छान साथ दिली
  • दिल्लीने मॅच सहज जिंकली

अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २५व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. दिल्लीने मॅच सात विकेट राखून जिंकली. दिल्लीच्या पृथ्वी शॉने ४१ बॉलमध्ये ११ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८२ धावांची झंझावाती खेळी केली. पृथ्वीच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने मॅच सहज जिंकली. Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 7 wickets

पृथ्वीला शिखर धवनने छान साथ दिली. धवनने ४७ बॉलमध्ये ४६ धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंतने आठ बॉलमध्ये १६ धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने तीन बॉलमध्ये नाबाद सहा धावा केल्या. विजयासाठी १५५ धावांची आवश्यकता असताना दिल्लीने १६.३ ओव्हरमध्ये तीन बाद १५६ धावा केल्या आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची मॅच सात विकेट राखून जिंकली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने तीन विकेट घेतल्या.

याआधी टॉस जिंकून दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये सहा बाद १५४ धावा केल्या. नितीश राणा (१५ धावा), राहुल त्रिपाठी (१९ धावा), इऑइन मॉर्गन (शून्य धावा), सुनिल नरेन (शून्य धावा), शुभमन गिल (४३ धावा), दिनेश कार्तिक (१४ धावा) बाद झाले. पॅट कमिन्सने नाबाद ११ धावा केल्या. दिल्लीकडून ललित यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन तर मार्कस स्टोइनिस आणि आवेश खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी