धवनमुळे दिल्लीने सर केले विजयाचे शिखर

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 19, 2021 | 02:07 IST

Delhi Capitals beat Punjab Kings by 6 wickets वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अकराव्या लीग मॅचमध्ये दिल्लीने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्स विरुद्धची मॅच सहा विकेट राखून जिंकली.

Delhi Capitals beat Punjab Kings by 6 wickets
धवनमुळे दिल्लीने सर केले विजयाचे शिखर 

थोडं पण कामाचं

  • धवनमुळे दिल्लीने सर केले विजयाचे शिखर
  • शिखर धवनने ४९ चेंडूत ९२ धावांची दमदार खेळी केली
  • ऑरेंज कॅपचा मानकरी आणि मॅन ऑफ द मॅच झाला शिखर धवन

मुंबईः वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अकराव्या लीग मॅचमध्ये दिल्लीने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्स विरुद्धची मॅच सहा विकेट राखून जिंकली. धवनच्या दमदार खेळीमुळे दिल्लीने विजयाचे शिखर सहज सर केले. Delhi Capitals beat Punjab Kings by 6 wickets

दिल्ली कॅपिटल्सची टीम १९६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. त्यांनी १८.२ ओव्हरमध्ये ४ बाद १९८ धावा केल्या आणि मॅच सहा विकेट राखून जिंकली. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनने ४९ चेंडूत ९२ धावांची दमदार खेळी केली. शिखरने १३ चौकार आणि २ षटकार मारत पंजाब किंग्सची दाणादाण उडवली. शिखर धवन सोबत सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने १७ चेंडूत ३२ धावा केल्या. स्टीव्हन स्मिथ ९, रिषभ पंत १५, मार्कस स्टोइनिस नाबाद २७ आणि ललित यादव नाबाद १२ धावा करू शकले. पंजाब किंग्सकडून रिचर्डसनने दोन तर अर्शदीप सिंह आणि मेरेडिथ या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

याआधी टॉस जिंकून दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सने २० ओव्हरमध्ये चार बाद १९५ धावा केल्या. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीने १२२ धावांची शतकी सलामी दिली. केएल राहुलने ६१ तर अग्रवालने ६९ धावा केल्या. ख्रिस गेल ११, दीपक हुडा नाबाद २२, निकोलस पूरन ९ आणि शाहरूख खान नाबाद १५ धावांचे योगदान देऊ शकले. पंजाब किंग्सकडून आवेश खान, ख्रिस वोक्स, ल्युकमन मेरीवाला आणि कगिसो रबाडा या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

शिखर धवन ऑरेंज कॅपचा मानकरी

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. स्पर्धा सुुरू असताना कॅप वेगवेगळ्या खेळाडूंमध्ये त्यांच्या कामगिरीमुळे फिरते आणि फायनल मॅचनंतर स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणाऱ्याला मानाने ऑरेंज कॅप देतात. सध्या शिखर धवनकडे ऑरेंज कॅप आहे. त्याने तीन मॅचमध्ये १८६ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तोच आहे. तोच आजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी