धवनचे अर्धशतक दिल्लीला फळले

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated May 03, 2021 | 01:17 IST

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २९व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून विजय मिळवला.

Delhi Capitals beat Punjab Kings by 7 wickets
धवनचे अर्धशतक दिल्लीला फळले 

थोडं पण कामाचं

  • धवनचे अर्धशतक दिल्लीला फळले
  • अग्रवालने केल्या ९९ धावा
  • पंजाबचा पराभव

अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २९व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून विजय मिळवला. पंजाब किंग्सचा पराभव झाला. विजयामुळे दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. टॉस जिंकून दिल्लीने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६६ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने १७.४ ओव्हरमध्ये ३ बाद १६७ धावा करुन मॅच जिंकली. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद अर्धशतक साजरे केले.  Delhi Capitals beat Punjab Kings by 7 wickets

धावांचा पाठलाग करत असलेल्या दिल्लीला सलामीच्या जोडीने ६३ धावांची भागीदारी करुन छान सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉ २२ चेंडूत ३९ धावा करुन हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. शिखर धवनने मात्र अतिशय जबाबदारीने खेळत अखेरपर्यंत मैदानात उभे राहून दिल्लीच्या विजयाचा मार्ग सोपा केला. धवनने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ६९ धावा केल्या. स्टीव्हन स्मिथ २२ चेंडूत २४ धावा करुन रिले मेरेडिथच्या चेंडूवर डेव्हिड मालनकडे झेल देऊन परतला. यष्टीरक्षक कर्णधार रिषभ पंत ११ चेंडूत १४ धावा करुन ख्रिस जॉर्डनच्या चेंडूवर मयंक अग्रवालच्या हाती झेल देऊन परतला. नंतर शिमरॉन हेटमायरने आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली. हेटमायरने ४ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद १६ धावा केल्या. शिखर धवन आणि हेटमायरने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

याआधी पंजाबने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६६ धावा केल्या. पंजाबच्या मयंक अग्रवालने ५८ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ९९ धावा केल्या. पण त्याची कामगिरी वाया गेली. पंजाबने मॅच गमावली. प्रभमीमरण सिंहने १२, ख्रिस गेलने १३, डेव्हिड मालनने २६, दीपक हूडाने १, शाहरूख खानने ४, ख्रिस जॉर्डनने २ धावा केल्या. हरप्रीत ब्रारने नाबाद ४ धावा केल्या. दिल्लीच्या कगिसो रबाडाने ३ तर अक्षर पटेल आणि आवेश खानने प्रत्येकी एक विकेट घेतली. दीपक हूडा धावचीत झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी