कोलकाता संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आयसोलेट

IPL 2021
भरत जाधव
Updated May 04, 2021 | 13:38 IST

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये कोरोनाचं (Corona) संकट वाढू लागलं आहे.

Delhi Capitals isolated
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयसोलेट  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • आठ तारखेला दिल्ली आणि कोलकाताचा सामना होणार ?
  • २९ एप्रिलला दोन्ही संघामध्ये झाला होता सामना
  • कोलकाता नाइटरायडर्स संघ ७ दिवसांपर्यंत आहे आयसोलेट

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये कोरोनाचं (Corona) संकट वाढू लागलं आहे. सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata knight Riders) वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने स्वत:ला अलगीकरणात म्हणजेच आयसोलेट केले आहे.

केकेआरने (KKR)  शेवटचा सामना हा २९  एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्धात खेळला होता. केकेआरचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह  झाल्याचे समजल्यानंतर दिल्लीच्या  संघाला आयसोलेट करण्यास सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या दरम्यान सामना होणार आहे. दरम्यान दोन्ही संघांनी सोमवारी सराव सत्रात सहभाग घेतला नाही.  दिल्लीच्या डीडीसीएचे पाच ग्राउंड कर्मचाऱ्यांना कोरोनाची  लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही संघांनी हा निर्णय घेतला. 

केकेआरमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली याला संघच जबाबदार आहे. वरुण चक्रवर्ती बायो बबलपासून बाहेर गेला होता, विशेष म्हणजे संघानेच त्याला जाण्यास सांगितले होते. दरम्यान वरुण चक्रवर्ती अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्ये गुडघे स्कॅन करण्यासाठी गेला होता. त्याच्या संघाने त्याला जाण्यास परवानगी दिली होती. 

दरम्यान दिल्लीचा पुढील सामना हा ८ मे ला कोलकाताविरुद्धात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सध्या केकेआरचे  दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने संघाने  स्वत:ला ७ दिवसांसाठी  आयसोलेट केले आहे. यामुळे ८ तारेखाल सामना होणार का यावर प्रश्न उपस्थित होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी