IPL-2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा पराभव, कर्णधार ऋषभ पंत फलंदाजांवर भडकला

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated Apr 08, 2022 | 08:42 IST

LSG vs DC : आयपीएल (IPL-2022) च्या 15 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. यानंतर दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतने फलंदाजीबाबत चिंता व्यक्त केली.

Delhi Capital's second defeat in IPL-2022, captain Rishabh Pant lashes out at batsmen
IPL-2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा पराभव, कर्णधार ऋषभ पंत फलंदाजांवर भडकला ।   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला.
  • ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा पराभव
  • शॉची झंझावाती खेळी वाया गेली, डी कॉकने झळकावले दुसरं अर्धशतक

मुंबई : पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला IPL-2022 मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मोसमातील 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. पृथ्वी शॉच्या अर्धशतकानंतरही दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 149 धावा करता आल्या. यानंतर लखनौने 2 चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत खूपच निराश दिसला आणि तो फलंदाजांवर संतापला. (Delhi Capital's second defeat in IPL-2022, captain Rishabh Pant lashes out at batsmen)

अधिक वाचा : IPL 2022:सेहवागने मुंबई इंडियन्सच्या जखमेवर चोळले मीठ, केले हे ट्वीट

दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत 39 आणि सर्फराज खानने 36 धावा करून नाबाद माघारी परतला. दोघांनीही ७५ धावांची नाबाद भागीदारी केली मात्र संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लखनौचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 80 धावांची खेळी करत सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे वळवला. आयुष बडोनीने विजयी षटकार ठोकला. सामनावीर ठरलेल्या डी कॉकने 52 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

अधिक वाचा : ​ MI vs KKR: ३५ धावा देणारा खेळाडू गुन्हेगार नव्हे तर हा आहे खरा व्हिलन - रोहित

लखनौच्या 100 धावा 14 व्या षटकात पूर्ण झाल्या. संघाला शेवटच्या 6 षटकात 8 विकेट्स शिल्लक असताना 46 धावा करायच्या होत्या. एनरिक नॉर्सिया महागडा ठरला. त्याने 2.2 षटकात 36 धावा दिल्या. दोन बीमर टाकल्याबद्दल त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, 52 चेंडूत 80 धावा करून डी कॉक कुलदीपने बाद केला. 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

डी कॉक बाद झाल्यानंतर लखनौला शेवटच्या 4 षटकांत विजयासाठी 28 धावा करायच्या होत्या. दीपक हुडा आणि कृणाल पंड्या क्रीजवर होते. दरम्यान, 2 षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांनी केवळ 9 धावा देत सामना रंजक करण्याचा प्रयत्न केला. आता लखनौला 12 चेंडूत 19 धावा करायच्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने १९ वे षटक टाकले. त्याने 14 धावा दिल्या. कृणा पंड्याने षटकार ठोकला. शेवटच्या षटकात ५ धावा करायच्या होत्या. गोलंदाज होता शार्दुल ठाकूर. पहिल्या चेंडूवर हुड्डा 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर आयुष बडोनी धावा करू शकला नाही. तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. बडोनीने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून विजय मिळवून दिला. कृणाल पंड्या 14 चेंडूत 19 धावा करून नाबाद राहिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी