DC vs PK Match Preview: जिंकण्यास इच्छुक दिल्ली आणि पंजाब

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 18, 2021 | 15:13 IST

संध्याकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येतील. हे दोन्ही संघ आजची मॅच जिंकण्यास इच्छुक आहेत.

Delhi Capitals vs Punjab Kings Match Preview IPL 2021 Match 11 Rishabh Pant KL Rahul
जिंकण्यास इच्छुक दिल्ली आणि पंजाब 

थोडं पण कामाचं

  • DC vs PK Match Preview: जिंकण्यास इच्छुक दिल्ली आणि पंजाब
  • दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या प्रत्येकी दोन लीग मॅच झाल्या
  • दोन्ही संघांनी आपली पहिली लीग मॅच जिंकली आणि दुसरी गमावली

मुंबई: आयपीएलची ११वी लीग मॅच रविवारी (१८ एप्रिल २०२१) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या मॅचच्या निमित्ताने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येतील. हे दोन्ही संघ आजची मॅच जिंकण्यास इच्छुक आहेत. Delhi Capitals vs Punjab Kings Match Preview IPL 2021 Match 11 Rishabh Pant KL Rahul

आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या प्रत्येकी दोन लीग मॅच झाल्या आहेत. दोन्ही संघांनी आपली पहिली लीग मॅच जिंकली आणि दुसरी लीग मॅच गमावली. आता पुन्हा जिंकून विजयपथावर येण्यास दोन्ही संघ इच्छुक आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सची पहिली लीग मॅच चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. ही मॅच त्यांनी सात विकेट राखून जिंकली. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा पराभव झाला, ती मॅच राजस्थान रॉयल्सने तीन विकेट राखून जिंकली. तसेच पंजबा किंग्सने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच चार धावांनी जिंकली. नंतरच्या चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा पराभव झाला. ही मॅच चेन्नई सुपरकिंग्सने सहा विकेट राखून जिंकली. 

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंत आणि पंजाब किंग्सचे नेतृत्व केएल राहुल (लोकेश राहुल) करत आहे. दोन्ही कर्णधारांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. रिषभचा कर्णधारपदाचा अनुभव मर्यादीत आहे. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये रिषभ पंतने रविचंद्रन अश्विन सारख्या अनुभवी गोलंदाजाला जास्त संधी दिली नाही पण टॉम करण सारख्या मध्यमगती गोलंदाजाला वापरण्यावर भर दिला. या चुकीमुळे दिल्लीला मॅच गमवावी लागली. पंत हळू हळू शिकत आहे. पण कागदावर आजही दिल्लीची टीम सक्षम आहे.

आजच्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स एनरिचला संधी देण्याची शक्यता आहे. कारण टॉम करणची गोलंदाजी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सहज काढली. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यावर दिल्लीचा भर असेल. तर चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्सला त्यांच्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. 

वानखेडेवर संध्याकाळी दव पडेल. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्याकडून धावा वाढवण्याची अपेक्षा आहे तर कगिसो रबाडा, ख्रिस वोक्स, आवेश खान आणि रविचंद्रन अश्विनकडून चमकदार गोलंदाजीची अपेक्षा आहे. तसेच पंजाब किंग्सच्या केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल यांच्याकडून धावा वाढवण्याची अपेक्षा आहे तर मोहम्मद शमी, रिचर्डसन, मुरुगन अश्विन यांच्याकडून चमकदार गोलंदाजीची अपेक्षा आहे.

अंतिम ११ खेळाडू यांच्यातून निवडणार - 

दिल्ली कॅपिटल्स :  रिषभ पंत (कर्णधार), अंजिक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमीयर, ख्रिस वॉक्स, अॅनरिच नॉर्टजे , स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज, प्रवीण दुबे, विष्णू विनोद

पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मंदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसीमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल , डेव्हिड मालन, झ्ये रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोइसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन अॅलन, सौरभ कुमार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी