DC vs RR, No Ball Controversy । मुंबई : आयपीएल २०२२ चा ३४ वा सामना शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये शेवटच्या षटकात नो बॉलचा वाद झाला. अंपायरने नो बॉल न दिल्याच्या निषेधार्थ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावण्याचे संकेत दिले होते. पंचांच्या निर्णयाला विरोध करताना ऋषभ पंतसह शार्दुल ठाकूर आणि सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरेही आक्रमक झाले. दरम्यान आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने तिघांवरही कडक कारवाई केली आहे. (Delhi skipper Rishabh Pant was sentenced for arguing with the umpire).
अधिक वाचा : या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा ११ वा हप्ता
पंत, ठाकूर आणि अमरे हे तिघेही आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले असून त्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना त्यांच्या सामन्याच्या फीच्या १००% पर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. अमरे यांच्यावरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तर शार्दुल ठाकूरला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार शुक्रवारी घडला जेव्हा राजस्थानच्या संघाने दिल्लीवर १५ धावांनी विजय मिळवला.सामन्यातील शेवटच्या षटकात ओबेड मॅककॉयच्या तिसऱ्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलने षटकार मारला तेव्हा ही घटना घडली. दिल्लीचा संघ नो-बॉलची मागणी करत असलेला चेंडू फुल टॉस होता. नॉन-स्ट्रायकरकडे असलेल्या कुलदीप यादवने अंपायरकडे बोट दाखवून शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहण्यास सांगितले कारण तो कमरेच्या वर असता तर तो नो-बॉल होऊ शकला असता. पॉवेलनेही पंचांशी बोलण्यास सुरुवात केली पण मैदानावरील पंचांनी चेंडू नो-बॉल नसल्याचे सांगितले.
अधिक वाचा : पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही
त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने पॉवेल आणि कुलदीपला मैदानातून परतण्यास सांगितले. दरम्यान दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे मैदानाकडे रवाना झाले. पंतने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.७ अंतर्गत लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे आणि तो दंड त्याला लागू होऊ शकतो. शार्दुलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ च्या लेव्हल २ चा गुन्हा आणि दंड देखील मान्य केला आहे. तर अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यांना आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अन्वये लेव्हल टू अंतर्गत दंड ठोठावला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे या सामन्यात जोस बटलरने ११६ धावांची शतकीय खेळी केली. बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्लीला १५ धावांनी पराभूत केले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ गडी गमावून २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २० षटकात ८ गडी गमावून २०७ धावा केल्या. जोस बटलरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.