मुंबई: इंडियन प्रीमीयर लीग(IPL 2021)२०२१ची सुरूवात येत्या ९ एप्रिलपासून होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नई (Chennai) मध्ये खेळवला जात आहे. जसे जसे आयपीएल जवळ येत आहे तसे तसे संघाना झटके बसत आहेत. कोरोनाने (Coronavirus) सगळ्या संघाना त्रास देत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबाबत बोलायचे झाल्यास त्यांचा सलामीवीर देवदत्त पडीकक्ल(Devdutt Padikkal) कोरोनाबाधित झाला आहे. आरसीबीने रविवारी संध्याकाळी ट्विटरवरून याची माहिती दिली.
देवदत्त पडीक्कल कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आरसीबीला मोठा झटका बसला आहे. गेल्या आयपीएलमध्ये पडीक्कलची कामगिरी चांगली झाली होती. त्याने १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या होत्या. गेल्या हंगामात पडिक्कलने विराट कोहलीपेक्षाही जास्त धावा केल्या होत्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. पडिक्कल बाहेर झाल्याने या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते.
सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत याने आरसीबीमध्ये जागा मिळवली. या सलामीवीराने केरळसाठी ५ सामन्यांत १९४.५४च्या सरासरीने २१४ धावा केल्या. आरसीबी पडिक्कलच्या जागी अझरुद्दीनला संधी देऊ शकते.
न्यूझीलंडचा सलामीवीर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. अशातच आरसीबी फिन अॅलनला संधी देऊ शकते. फिन अॅलनने नुकतेच बांगलादेशविरुद्ध २९ चेंडूत ७१ धावांची दमदार खेळी केली.
मध्य प्रदेशच्या या फलंदाजाने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये रजतने ५ सामन्यात २ अर्धशतके आणि एका सामन्यात ९० धावांची खेळी करत आरसीबीमध्ये आपली जागा पक्की केली. त्यामुळे यालाही संधी मिळू शकते.
पडीक्कल बाहेर झाल्याने विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे कोणाला संधी देणार हाही प्रश्न आहे. पडीक्कल लवकरात लवकर बरा होऊन संघात परतावा अशीच आरसीबीची इच्छा आहे. तसेच गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही त्याची बॅट तळपावी असे त्यांना वाटत आहे.