दिनेश कार्तिकला BCCIने दिली शिक्षा, पण IPLचा कोणता नियम तोडला ?

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated May 27, 2022 | 21:06 IST

IPL 2022: IPL आचारसंहितेचा भंग बुधवार, 25 मे 2022 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील एलिमिनेटर सामन्यादरम्यान झाला.

Dinesh Karthik sentenced by BCCI, but which IPL rules were broken?
दिनेश कार्तिकला BCCIने दिली शिक्षा, पण IPLचा कोणता नियम तोडला ?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकची मोठी चूक
  • आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले
  • मॅचदरम्यान, काही वाईट शब्द तोंडातून बाहेर पडले.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फटकारण्यात आले आहे. बुधवार, 25 मे 2022 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान IPL आचारसंहितेचे उल्लंघन झाले. बीसीसीआयने दिनेश कार्तिकला शिक्षा सुनावली आहे, पण त्याने कोणता गुन्हा केला आहे हे उघड केलेले नाही. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव केला. (Dinesh Karthik sentenced by BCCI, but which IPL rules were broken?)

अधिक वाचा : 

Video: आयर्लंडच्या फलंदाजाची तुफान फटकेबाजी, ५ बॉलवर ठोकले ५ सिक्स, १९ बॉलवर ठोकले ९६ रन्स

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात दिनेश कार्तिकने नेमका काय गुन्हा केला याचा उल्लेख नाही. "दिनेश कार्तिकने आयपीएल आचारसंहितेच्या नियम 2.3 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा आणि शिक्षा स्वीकारली आहे," असे निवेदनात म्हटले आहे. आचारसंहितेनुसार, लेव्हल 1 च्या गुन्ह्यात सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

अधिक वाचा : 

MS Dhoni: IPL 2022नंतर एमएस धोनी करतोय इलेक्शन ड्युटी! जाणून घ्या प्रकरण

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 37 धावांची मौल्यवान खेळी खेळली. त्याने रजत पाटीदारसोबत 41 चेंडूत 92 धावांची नाबाद भागीदारीही केली. त्या सामन्यात रजत पाटीदारने 54 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.

अधिक वाचा : 

IPL 2022:राजस्थानला मात देत RCBला मिळणार फायनलचे तिकीट? उतरवावे लागतील हे प्लेईंग ११

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी दिनेश कार्तिकची भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएलच्या दमदार हंगामानंतर दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2022 मध्ये, तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी अनेक सामन्यांमध्ये फिनिशर होता आणि त्याने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिनेश कार्तिक तब्बल ३ वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्या सामन्यात दिनेश कार्तिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याला केवळ 6 धावा करता आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी