IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध जबरदस्त खेळणारा हा वैभव अरोरा कोण?

IPL 2022
Updated Apr 04, 2022 | 14:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vaibhav Arora dream debut in IPL 2022: पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आपले पदार्पण केले. चार ओव्हरमध्ये केवळ २१ धावा देत २ विकेट घेतल्या. 

vaibhav arora
चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध जबरदस्त खेळणारा हा वैभव अरोरा कोण? 
थोडं पण कामाचं
 • पंजाब किंग्सने वैभव अरोराचे पदार्पण केले.
 • अरोराने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पदार्पण केले. 
 • अरोराने चार ओव्हरमध्ये २१ धावा देत २ विकेट मिळवल्या.

मुंबई: पंजाब किंग्सने(Punjab kings) रविवारी आयपीएल २०२२मधील(ipl 2022) ११व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला(chennai superkings) ५४ धावांनी मात देत दुसरा विजय मिळवला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात १८१ धावांचा पाठलाग करताना सीएसकेचा संपूर्ण संघ १२६ धावांवर बाद झाला. या सामन्यात युवा गोलंदाज वैभव अरोराचे कौतुक झाले. त्याने आयपीएल पदार्पण केले होते. वैभव अरोराच्या निवडीवरून अनेक सवाल उपस्थित झाले होते कारण त्याला वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या जागी सामील करण्यात आले होते. दरम्यान, या युवा गोलंदाजांने आपली निवड सार्थ ठरवली. तसेच पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. Do you know all about vaibhav arora?

अधिक वाचा - मनसे कार्यकर्त्यांनी लावली हनुमान चालीसा

वैभव अरोराने पॉवरप्लेमध्ये रॉबिन उथप्पा आणि मोईन अली सारख्या घातक फलंदाजांच्या विकेट घेतल्या आणि सीएसकेचे फलंदाजी आक्रमण उधळून लावले. अरोराने आपल्या चार ओव्हरमध्ये २१ धावा देत दोन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे वैभव अरोराने त्या पिचवर चांगली कामगिरी केली जिथे पंजाबचे फलंदाज शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आणखी एक डेब्यूटंट जितेश शर्माने चांगली खेळी केली होती. 

जाणून घ्या वैभव अरोराबद्दल...

 1. वैभव अरोराचा जन्म १४ डिसेंबर १९९७मध्ये झाला होता. तो आता २४ वर्षांचा झाला आहे. 
 2. अरोराने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशसाठी खेळतो आणि २०१९मध्ये सौराष्ट्रविरुद्ध त्याने फर्स्ट क्लासमध्ये पदार्पण केले होते. 
 3. या वेगवान गोलंदाजाने २०२१मध्ये चंदीगडकडून पदार्पण केले होते. 
 4. पंजाब किंग्सने आयपीएल २०२०मध्ये वैभव अरोराला नेट गोलंदाज म्हणून ठेवले होते. 
 5. वैभव अरोरा आधी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. 
 6. पंजाब किंग्सने आयपीएल २०२२ मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडूला दोन कोटी रूपयांना खरेदी केले होता. अरोराला खरेदी करण्यासाठी पंजाबला केकेआरसोबतचे बोलीयुद्ध झाले होते. 
 7. वैभव अरोराने आपल्या पंजाब किंग्ससोबतचा सहकारी अर्शदीप सिंहसोबत ज्युनियर लेव्हल क्रिकेट खेळत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. 
 8. वैभव अरोराने आर्थिक समस्येमुळे काही काळ आधी क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता मात्र त्याचे लहानपणाचे कोच रवी वर्मा यांनी खेळ सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी