ड्वेन ब्राव्होला दुखापत, आयपीएलमधून बाद

dwayne bravo can be out for few weeks चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याला दुखापत झाली

dwayne bravo can be out for few weeks
ड्वेन ब्राव्होला दुखापत, आयपीएलमधून बाद 

थोडं पण कामाचं

  • ड्वेन ब्राव्होला दुखापत, आयपीएलमधून बाद
  • ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत
  • ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये किमान पुढील काही मॅच खेळणार नाही

शारजा: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याला दुखापत झाली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आयपीएलच्या (IPL 2020) पुढील मॅच ब्राव्हो न खेळण्याची शक्यता आहे. (dwayne bravo can be out for few weeks)

ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत झाली. या दुखापतीमुळे मॅचच्या अंतिम टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सला जिंकण्यासाठी १७ धावा हव्या असताना ब्राव्हो गोलंदाजी करू शकला नव्हता. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप लक्षात येताच ब्राव्होला विश्रांती घेऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. 

स्नायूंच्या दुखापतीमुळे ब्राव्होच्या हालचालींवर आल्या मर्यादा

स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळण्यासाठी वेगाने पायाच्या हालचाली करताना ब्राव्होला प्रचंड त्रास होत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये तीन ओव्हर टाकणाऱ्या ब्राव्होला दुखापतीचा त्रास सतावू लागला. अखेर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. नंतर मॅच संपेपर्यंत तो परतला नाही. दिल्ली कॅपिटल्सने पाच विकेट राखून मॅच जिंकली. मॅचनंतर ब्राव्होच्या दुखापतीची चर्चा सुरू झाली.

ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये किमान पुढील काही मॅच खेळणार नाही

दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये किमान पुढील काही मॅच खेळणार नाही, असे चेन्नई सुपरकिंग्स संघाचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी सांगितले. वैद्यकीय पथक ब्राव्होच्या दुखापतीवर उपचार करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

ब्राव्होच्या दुखापतीमुळे दिल्ली विरुद्ध शेवटची ओव्हर जाडेजाने टाकली

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचच्या अंतिम टप्प्यात एक ओव्हर ब्राव्हो टाकेल अशी योजना होती. रविंद्र जाडेजा ओव्हर टाकणार नव्हता. मात्र ब्राव्हो परत मैदानात येणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर आयत्यावेळी रविंद्र जाडेजा हाच उपलब्ध असलेला चांगला पर्याय होता. पण या परिस्थितीसाठी तो तयार नव्हता. त्यामुळे आम्ही अंतिम टप्प्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याची कबुली फ्लेमिंग यांनी दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने षटकार, २ धावा, षटकार, षटकार आणि एक धाव काढली. नंतर वाईड बॉल गेला. 

धवनला थोपवण्यात चेन्नई सुपरकिंग्स अपयशी

शिखर धवनने चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळताना शनिवारी ५८ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याने १४ चौकार आणि एक षटकार मारला. धवनला थोपवण्यात चेन्नई सुपरकिंग्सचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पुरते अपयशी ठरले. अशातच ब्राव्होच्या दुखापतीचे वृत्त आल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स संघावरील दबाव वाढला आहे. 

चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या आणि राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर

सध्या चेन्नई सुपरकिंग्स ६ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. त्यांची उद्याची मॅच राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. राजस्थान रॉयल्स ६ पॉइंट्ससह सातव्या स्थानावर आहे. आरआरचा रन रेट सीएसकेच्या तुलनेत कमी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी