मुंबई: Chennai Super Kingsचा सलामी फलंदाज Ruturaj Gaikwad चा फॉर्म परतला आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने ९९ धावांची खेळी केली आणि डेवॉन कॉनवेसह पहिल्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी भागीदारी होती. गायकवाड आणि कॉनवेच्या जोडीने फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनचा रेकॉर्ड तोडला. faf du plesis jealous on me says ruturaj gaikwad after csk match
अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्या.
वॉटसन आणि डू प्लेसिसने २०२० आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना पहिल्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान दोघांची ही भागीदारी नाबाद ठरली होती. कॉनवेने ५५ बॉलमध्ये नाबाद ८५ धावा ठोकल्या. गेल्या हंगामात गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने सीएसकेसाठी डावाची सुरूवात केली होती. डू प्लेसिस या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे.
भागीदारीचा रेकॉर्ड तोडल्यानंतर गायकवाडने सीएसकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की हा रेकॉर्ड बनवून खूप चांगले वाटत आहे. आम्ही याची अपेक्षाच केली नव्हती. संघाला चांगली सुरूवात करून द्यावी अशी आमची इच्छा होती. मला वाटते की डू प्लेसिस माझ्यावर जळत असेल.
अधिक वाचा - Vastu : गरम तव्यावर का टाकू नये पाणी? कारण ऐकून व्हाल हैराण
CSK च्या प्रेस रिलीजनुसार "रवींद्र जडेजाने अत्याच्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला CSK चे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने CSK चे नेतृत्व मोठ्या हितासाठी केले आहे. जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू द्यावे.
आयपीएल 2022 चा 46व्या चेन्नई आणि हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यात धोनीने नेतृत्व केले. धोनी कर्णधार होताच संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पुन्हा फॉर्मात परतला आहे. हैदराबादविरुद्ध त्याने जोरदार शतक ठोकले. ऋतुराजने या सामन्यात 57 चेंडूत 99 धावा केल्या, गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली.