Fastest Half Century IPL 2023 विराट कोहली, फाफ डुप्लेसी आणि ग्लॅन मॅक्सवेल च्या धडाकेबाज फलंदाजीनंतर चिन्नास्वामी मैदानावर निकोलस पुरनचे वादळ आले. या वादळाने आपल्या तुफान फलंदाजीने IPL 2023 मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. ( Fastest Half Century in IPL 2023 by Nicholas Pooran!)
पुरनने 340 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 15 चेंडूमध्ये आपले झंझावती अर्धशतक पूर्ण केले. इतकेच नव्हे तर या केरेबियन खेळाडूच्या बॅटने IPL च्या इतिहासात 15 चेंडूत 50 धावांचे दुसरे वेगवान अर्धशतक केले आहे. पुरनच्या आधी यूसुफ पठाण आणि सुनील नरेन यांनी देखील या लीगमध्ये 15 चेंडूत अर्धशतके झळकावली होती. युसूफने 2014 आणि नरेनने 2017 च्या IPL मध्ये हा पराक्रम केला होता.
अधिक वाचा : IPL पॉइंट टेबलमध्ये LSG अव्वल स्थानावर
IPL 2023 मध्ये पूरनच्या आधी या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतकचा विक्रम CSK चा खेळाडू अजिंक्य रहाणे याच्या नावावर होता. रहाणे ने मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात 19 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले होते. रहाणे च्या झंझावाती फलंदाजीने 27 चेंडूमध्ये 61 धावांची उत्स्फूर्त खेळी केली होती.
अधिक वाचा : IPL 2023: अजिंक्य खेळी, वादळी फलंदाजीतून टीकाकारांना उत्तर
आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम के एल राहुल आणि पॅट कमिन्सच्या नावावर आहे. 2018 मध्ये, के एल राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना 14 चेंडूत अर्धशतक केले होते. त्याचवेळी, कमिन्सने 2022 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.