मुंबई: आयपीएल २०२२च्या(ipl 2022) आधी अनेक फ्रेंचायझींनी(frenchise) मेगा लिलावात(mega auction) या खेळाडूंवर चुकीची बोली लावली. संघांनी काही खेळाडूंना मोठी रक्कम देत खरेदी केले मात्र हे खेळाडू प्लेईंXI चा भागही नाही आहेत. संघांनी यावेळी अशा अनेक खेळाडूंवरही कोट्यावधी रूपये खर्च केले जे या हंगामात आतापर्यंत फ्लॉप(flopp players) राहिले आहेत आणि आता त्यांना प्लेईंग ११मध्ये स्थान मिळत नाही आहे. Flop Players of ipl 2022
अधिक वाचा - आता 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार
आयपीएल मेगा लिलाव २०२२मध्ये मुंबईच्या संघाने टीम डेविडला ८.२५ कोटी रूपयांना खरेदी केले. त्याची बेस प्राईज ४० लाख रूपये होती. टीम डेविड आपल्या जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम डेविडने या हंगामात केवळ २ सामने खेळले आणि ६.५०च्या सरासरीने केवळ १३ धावा केल्या आहेत. टीम डेविडला या दोन सामन्यानंतर प्लेईंग ११मध्ये जागा मिळालेली नाही.
दिल्ली कॅपिट्ल्ससाठी खेळणारा दक्षिण आफ्रिकेा घातक गोलंदाज एनरिक नॉर्खिया १५० किमीच्या स्पीडने गोलंदाजी करू शकतो. दिल्लीने नॉर्खियाला तब्बल ६.५० कोटी देऊ खरेदी केले होते. मात्र हंगामाच्या सुरूवातीलाच नॉर्खिया दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीचा परिणाम त्याच्या खेळावर पाहायला मिळाला. नॉर्खिया या हंगामात केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यातही तो फ्लॉप राहिला.
अधिक वाचा - धक्कादायक ! हातपाय बांधून महिलेवर सामूहिक बलात्कार
सनरायजर्स हैदराबादच्या फ्रेंचायझीने मेगा लिलावाआधी केन विल्यमसन्सशिवाय अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना रिटेन करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. अब्दुल समदला हैदराबादने ४ कोटींना रिटेन केले होते मात्र हैदराबादला त्याचा फायदा मिळाला नाही. या हंगामात अब्दुल समदला २ सामनेच खेळण्याची संधी मिळाली. तो दोन्ही सामन्यात फ्लॉप राहिला त्यानंतर अब्दुल समदलाही प्लेईंग ११मधून बाहेर करण्यात आले.