मुंबई: IPL 2022च्या ४५व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स(delhi capitals) आणि लखनऊ सुपर जायंट्स(lucknow supergiants) यांच्यातील सामना चांगलाच रंगला. लखनऊ्या संघाने शेवटी ६ धावांनी सामना आपल्या नावे केला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर लखनऊच्या गोटात सर्वच जल्लोष करू लागले. यातच संघाचे मेंटर आणि दिग्गज खेळाडू गौतम गंभीरही(gauta तेथे उपस्थित होता. लखनऊच्या विजयानंतर गंभीरने अशी प्रतिक्रिया दिली की त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरस होत आहे. gautam gambhir video viral on social media
अधिक वाचा - सोन्यात गुंतवणूक कशी करावी, अक्षय तृतियेला काय कराल...
लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. हा क्रिकेटर आपली सीट सोडून असे सेलिब्रेशन करत होता की सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो इतका जोशात होता की त्या दरम्यान त्याच्या तोंडातून शिवी निघाली. असे यासाठी कारण लखनऊ आणि दिल्ली यांच्यातील सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत पोहोचला होता. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा होता. रोमांचक सामना पाहून गंभीरचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि असे घडले. गंभीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
#gautamgambhir remembering #benstokes #LSGvDC #IPL2022 pic.twitter.com/Cl8zmaobft
— مقداد دیوان (@miqdad_diwan) May 1, 2022
याआधी लखनऊच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर शानदार विजय मिळवला. दिल्लीला या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये २१ धावा हव्या होत्या. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिस शेवटची ओव्हर टाकत होता. तेव्हा अचानक हा सामना फिरला. शेवटच्या दोन बॉलवर दिल्लीला १३ धावा हव्या होत्या.. मात्र स्टॉयनिस डिफेंड करण्यात यशस्वी ठरला. यासह लखनऊचे १४ गुण झाले आहेत आणि हा संघ लीग टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
अधिक वाचा - केजीएफ 2 ची 400 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध युवा गोलंदाज मोहसिन खान सगळ्यात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. या सामन्यात मोहसिन खानने ४ ओव्हरमध्ये १६ धावा देत ४ विकेट मिळवल्या. मोहसिनचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे. याशिवाय रवी बिश्नोई आणि कृ्ष्णप्पा गौतम यांनीही चांगली गोलंदाजी आणि १-१ विकेट मिळवली. तर या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलनेही ७७ धावांची खेळी केली.