IPL मॅचदरम्यान मुलीने RCB च्या फॅनला केले प्रपोज, जाणून घ्या काय होते मुलाचे उत्तर?

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated May 05, 2022 | 15:49 IST

चेन्नई संघ १७४ धावांचा पाठलाग करत असताना कॅमेरामनने एक क्षण रेकॉर्ड केला ज्यामध्ये एक मुलगी आरसीबीच्या चाहत्याला प्रपोज करताना दिसली. आरसीबीच्या या चाहत्याने मुलीचा प्रस्ताव स्वीकारला.

Girl proposes to RCB fan during IPL match, find out what was the boy's answer?
IPL मॅचदरम्यान मुलीने RCB च्या फॅनला केले प्रपोज, जाणून घ्या काय होते मुलाचे उत्तर?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • RCB ने CSK चा 13 धावांनी पराभव केला.
  • कॅमेरामनने एक क्षण रेकॉर्ड केला
  • एक मुलगी आरसीबीच्या चाहत्याला प्रपोज करताना दिसली.

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 चा 49 वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने सीएसकेसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईचा संघ जेव्हा या धावसंख्येचा पाठलाग करत होता. तेव्हा कॅमेरामनने एक क्षण रेकॉर्ड केला ज्यामध्ये एक मुलगी आरसीबीच्या चाहत्याला प्रपोज करताना दिसली. आरसीबीच्या या चाहत्याने मुलीचा प्रस्ताव स्वीकारला आणि मुलीने अंगठी घातली. (Girl proposes to RCB fan during IPL match, find out what was the boy's answer?)

अधिक वाचा : World cup: टीम इंडिया का हरली होती वर्ल्ड कप २०१९ची सेमीफायनल, युवराजने सांगितले कारण

वसीम जाफर त्याच्या मजेशीर ट्विटसाठी खूप प्रसिद्ध झाला आहे, तो सामन्याशी संबंधित परिस्थितींवर असे मीम्स शेअर करतो, जे काही मिनिटांत व्हायरल होतात. IPL 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मुलीने आरसीबीच्या चाहत्याला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले आणि मुलाने त्याचा प्रस्ताव स्वीकारला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा : IPL 2022 मध्ये धोनीची जादू चालेना !, प्लेऑफच्या रेसमधून CSK बाहेर

हा फोटो शेअर करत वसीम जाफरने असे कॅप्शन लिहिले आहे, जो या फोटोप्रमाणेच व्हायरल झाला आहे. जाफरने फोटो ट्विट करून लिहिले, 'स्मार्ट मुलगी, जी आरसीबी फॅन्सला प्रपोज करत आहे. जर तो आरसीबी संघासोबत एकनिष्ठ राहू शकला तर तो नक्कीच त्याच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असेल. छान केले आणि प्रपोज करण्यासाठी योग्य दिवस निवडला.

अधिक वाचा : Longest sixes in IPL: आयपीएलच्या इतिहासातील हे आहेत सर्वात लांब सिक्स
आरसीबीचा संघ 15 वा आयपीएल हंगाम खेळत आहे, परंतु त्यांना आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. बुधवारी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर आरसीबीने सीएसकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवाने सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत, तर आरसीबी विजयासह पॉइंट टेबलमध्ये टॉप-4 मध्ये परतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी