IPL 2022: ११ कोटींचा हा खेळाडू RCBसाठी बनलाय डोकेदुखी

IPL 2022
Updated Apr 27, 2022 | 12:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Glenn Maxwell:आयपीएल २०२२मध्ये बंगळुरूचा विस्फोटक ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल सातत्याने फ्लॉप होत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत केवळ २४.८०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

rcb
IPL 2022: ११ कोटींचा हा खेळाडू RCBसाठी बनलाय डोकेदुखी 
थोडं पण कामाचं
  • मॅक्सवेलला आरसीबीने १ कोटींना रिटन केले होते
  • मॅक्सवेल या हंगामात सातत्याने फ्लॉप ठरत आहे.
  • आतापर्यंत हंगामात ६ सामने खेळलेत या त्याने २४.८०च्या सरासरीने केवळ १२४ धावा केल्यात.

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी(royal challengers bangalore) आयपीएल २०२२मध्ये(ipl 2022) गेले २ सामने खूपच खराब राहिले आहेत. बंगळुरूने हंगामातील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र आता संघासाठी काही चांगले होत नाही आहे. बंगळुरूचा कर्णधार डू प्लेसिससाठी(faf du plesis) एक खेळाडू डोकेदुखी ठरत आहे. हा विस्फोटक ऑलराऊंडर गेल्या हंगामात संघातील सगळ्यात मोठा हिरो होता. Glenn maxwell flop performance in ipl 2022

अधिक वाचा - रेशनकार्ड संदर्भात मोठी बातमी, हे न केल्यास होईल मोठे नुकसान

RCBसाठी डोकेदुखी ठरलाय हा क्रिकेटर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हंगामाच्या सुरूवातीसाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराज  सह ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेललाही रिटेन केले होते. मॅक्सवेलला आरसीबीने १ कोटींना रिटन केले होते मात्र मॅक्सवेल या हंगामात सातत्याने फ्लॉप ठरत आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत हंगामात ६ सामने खेळलेत या त्याने २४.८०च्या सरासरीने केवळ १२४ धावा केल्यात. या ६ डावांत त्याच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक निघाले. 

IPLमध्ये जबरदस्त रेकॉर्ड

गेल्या वर्षी या फलंदाजाने आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. ग्लेन मॅकसवेलने आतापर्यंत आयपीएलच्या १०३ सामन्यांमध्ये २३ विकेट मिळवल्या आहेत आणि २१४२ धावा केल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी ११६ वनडे सामन्यांमध्ये ५१ विकेट आणि ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३४ विकेट मिळवल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने वनडे सामन्यांमध्ये ३२३० धावा आणि टी-२० सामन्यांमध्ये १९८२ धावा केल्या आहेत. 

अधिक वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, या 3 भत्त्यात होणार वाढ!

१५व्या हंगामात आरसीबीची ही स्थिती

मॅक्सवेल या हंगामाच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संघात नव्हता. त्याने नुकतेच लग्न केले ज्यामुळे तो सुरूवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. आरसीबीने सुरूवातीच्या सामन्यात पराभव पाहिला होता. मात्र त्यानंतर त्यांनी धमाकेदार कामगिरी केली आणि सातत्याने चांगले प्रदर्शन केले. संघाने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळलेत. यात त्यांना ५ सामन्यांमध्ये विजय तर ४ सामन्यांमध्ये पराभव पाहावा लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी