मुंबई: आयपीएल २०२२मध्ये गोलंदाज जबरदस्त कामगिरी करत आहेत. फलंदाजांपेक्षा या हंगामात गोलंदाजांची जास्त चर्चा होत आहे. अशातच गोलंदाजांनी सध्याच्या हंगामात फलंदाजांना गोल्डन डकवर आऊट करण्याचा असा रेकॉर्ड केला आहे जो आयपीएलमध्ये कधीच झाला नव्हता.golde duck half ccentury complete in ipl 2022
अधिक वाचा - तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपविले आयुष्य
गुरूवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज डेवॉन कॉन्वे मुकेश चौधरीविरुद्ध खेळताना पहिल्याच बॉलवर एलबीडब्लू झाला. सध्याच्या हंगामातील ही ५०वी वेळ जेव्हा एखादा फलंदाज गोल्डन डकची शिकार होत पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्यांदा आयपीएल हंगामात खेळाडूंच्या गोल्डन डकचे अर्धशतक पूर्ण झाले.
याआधी एका हंगामात सर्वाधिक गोल्डन डकची शिकार होण्याचा रेकॉर्ड २०१३ साली बनला होता. त्या हंगामात एकूण ४६ खेळाडू पहिल्या बॉलवर बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अशातच लाजिरवाणा रेकॉर्ड तुटण्यात ९ वर्षांचा कालावधी लागला
आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ५९ सामन्यांत ९२ खेळाडू शून्यावर बाद झाले. यातील ५० खेळाडूंनी आपली विकेट पहिल्याच बॉलवर गमावली. हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे सर्वाधिक १६ शून्यावर बाद केले. तर राजस्थान रॉयल्सचा शून्यावर बाद होणारा एकमेव खेळाडू देवदत्त पडिक्कल आहे.
अधिक वाचा - ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाची घोषणा
या यादीत दुसऱ्या स्थानावर आरसीबी १३ शून्यावर आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई आणि चेन्नईचे संघ आहे ज्यांचे ११-११ खेळाडू न खाते खोलता पॅव्हेलियनमध्ये परतले. तर गुजरातचे १०, पंजाब किंग्सचे ९, सनरायजर्स हैदराबादचे८, दिल्ली कॅपिटल्सचे ७ आणि लखनऊ सुपर जायंट्सचे ६ आणि राजस्थानचा केवळ १ खेळाडू खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतले.