मुंबई: आयपीएल २०२२च्या(ipl 2022) हंगामात पराभवापासून सुरूवात करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी(mumbai indians) चांगली बातमी समोर आली. दुखापतीतून सावरलेला मुंबई टीमचा स्टार प्लेयर सूर्यकुमार यादव(suryakumar yadav) आता संघात सामील झालाय. ही बाब मुंबई फ्रेंचायझीने आपल्या विधानात सांगितली. Good news for rohit sharma mumbai indians
अधिक वाचा- बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल
खरंतर, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव आयपीएल २०२२च्या हंगामाच्या सुरूवातीला मुंबई इंडियन्ससोबत नव्हता. तो बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये होता. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. सोबतच्या खेळाडूंसोबत जिमही सुरू केली आहे. मुंबई फ्रेंचायझीने या हंगामासाठी सूर्यकुमार यादवा ८ कोटी रूपयांसह रिटेन केले होते.
Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH — Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
मुंबई फ्रेंचायझीने आपल्या विधानात म्हटले की सूर्यकुमार यादवने क्वारंटाईन पूर्ण करून संघाला जॉईन केले आहे. सोबतच खेळाडू किरेन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराहसह जिमलाही सुरूवात केली आहे. यासोबतच कॅम्पमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अधिक वाचा - एप्रिल फुल डे च्या निमित्त मराठी Messages
आयपीएल २०२२च्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात मुंबईने १७८ धावांचे आव्हान दिले होते. यात दिल्ली संघाने हे आव्हान १८.२ ओव्हरमध्ये पूर्ण केले होते. यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने खूप धावा दिल्या होत्या. त्याने ३.२ ओव्हरमध्ये ४३ धावा दि्या होत्या. अशातच पुढील सामन्यात त्यांना गोलंदाजीवर काम करावे लागेल.