हार पत्करायला तयार नाही गुजरात टायटन्स; शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा

पावर-प्ले मध्ये सर्वात जास्त म्हणजे 17 विकेट्स घेणारा, टीम गुजरात टायटन्सच्या मजबूत खेळाडूंपैकी एक आहे गोलंदाज मोहम्मद शमी. याने आतापर्यंत 10 विकेट्स घेतले आहेत.

Gujarat Titans not ready to lose; Shami picked up the most wickets
शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा 
थोडं पण कामाचं
  • पावर-प्ले मध्ये सर्वात जास्त म्हणजे 17 विकेट्स घेणारा, टीम गुजरात टायटन्सच्या मजबूत खेळाडूंपैकी एक आहे गोलंदाज मोहम्मद शमी. याने आतापर्यंत 10 विकेट्स घेतले आहेत.
  • तो आपल्या शरीराला लवचिकपणे फिट करत कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो.
  • उत्कृष्ट खेळ करण्यासाठी तो प्रत्येक दिवशी विशेष व्यायाम करतो.

मुंबई : आयपीएल 2022 चा जवळपास अर्धा प्रवास आता संपलाय. रविवारपर्यंत लीग स्टेजचे 37 सामने झाले आहेत. यावेळी दोन नव्या टीम्स अर्थात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. आतापर्यंत दोन्हीही टीम्सची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. आकड्यांबाबत बोलायचं तर गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद हे मजबूत संघ असल्याचे सिद्ध झाले आहे. तिन्ही टीम्स सध्या पॉइंट्स टेबल मध्ये टॉप-3 मध्ये आहेत. यांच्या यशाचे रहस्य यांचा पावर-प्ले म्हणजेच पहिल्या 6 ओव्हरचा खेळ आहे. या काळात टायटन्सची गोलंदाजी सरासरी बाकी टीम्सच्या तुलनेत खूपच चांगली आहे. गुजरात टायटन्सच्या या एकतर्फी विजयाचे श्रेय जाते त्याच्या जोरदार टीमला. ही टीम उत्कृष्ट सामना खेळण्यासह सतत जिंकण्यात अजिबात कसली कसर सोडत नाहीय. पावर-प्ले मध्ये सर्वात जास्त म्हणजे 17 विकेट्स घेणारा, टीम गुजरात टायटन्सच्या मजबूत खेळाडूंपैकी एक आहे गोलंदाज मोहम्मद शमी. याने आतापर्यंत 10 विकेट्स घेतले आहेत. तो आपल्या शरीराला लवचिकपणे फिट करत कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. उत्कृष्ट खेळ करण्यासाठी तो प्रत्येक दिवशी विशेष व्यायाम करतो. याचे व्हिडिओतो स्वदेशी सोशल मीडिया मंच 'कू' अॅपच्या आपल्या हॅंडलवर टाकत असतो.  

या व्हीडिओमध्ये शमी सिंगल लेग वर्क करताना दिसत आहेत. मोहम्मद शमीने सीझनच्या आपल्या पहिल्या सामन्यातच लखनऊ सुपरजायंट्सच्या विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतले होते. शमी ने पॉवर-प्लेमध्ये लखनऊच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले होते. शमीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 78 सामने खेळले, ज्यात त्याने 8.6 च्या इकॉनॉमी रेटने 82 विकेट घेतले आहेत.

आयपीएलच्या या सीझनमध्ये जर कुठल्या टीमने प्रेक्षकांना सर्वात जास्त चकीत केलं असेल, तर ती गुजरात टायटन्सच आहे. लीलावानंतर म्हटलं जात होतं, की हार्दिक पांड्याच्या टीममध्ये फलंदाजांची कमतरता आहे. मात्र गुजरातने या चर्चांवर पूर्णविराम लावला होता. त्यांनी सातपैकी सहा मॅच जिंकल्या. ही टीम 12 अंकांसह टेबल पॉइंट्समध्ये टॉपवर आहे. या टीमला एकमात्र पराभव सनराइजर्स हैदराबादच्या विरुद्ध पत्करावा लागला.

दिसला कमाल योगायोग टायटन्स आयपीएलमध्ये गुजरातची दुसरी टीम आहे. याआधी 2016 आणि 2017 मध्ये गुजरात लायन्सने टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. हा केवळ योगायोग आहे, गुजरात लायन्सच्या टीमनेसुद्धा आपल्या पहिल्या सीझनमध्ये सातपैकी सहा मॅच जिंकल्या होत्या. त्यांनाही सनराइजर्स हैदराबादच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. योगायोगाने दोन्ही टीम्ससाठी तो मॅचच्या सीझनचा चौथाच सामना होता. पॉवर-प्लेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची सरासरी पॉवर-प्लेमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी सरासरी (17.5) गुजरात टाइटन्सची आहे. म्हणजे गुजरातचे गोलंदाज पॉवर-प्लेमध्ये प्रत्येक 17व्या चेंडूवर विकेट घेत आहेत. गुजरातचा नेट रनरेट +0.396 आहे. गुजरातला अजून सात मॅच खेळायच्या आहेत. यातून टीम जर तीन मॅच अजून जिंकते, तर प्लेऑफमध्ये त्या टीमचे स्थान पक्के होईल. एक किंवा दोन विजयांनंतरही स्थिती त्याच टीमसाठी अनुकूल राहिल, मात्र दुसऱ्या टीम्सच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी