IPL 2022 Prize Money: IPL चॅम्पियन गुजरात टायटन्सवर पडला करोडोंचा पाऊस; जाणून घ्या कोणत्या संघाला किती मिळाले बक्षीस

IPL 2022
Updated May 30, 2022 | 10:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 Prize Mone for Winning Team । आयपीएल २०२२ चा किताब स्पर्धेत पहिल्याच वर्षी सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने पटकावला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरातच्या संघाने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ बळी राखून पराभव केला.

 Gujarat Titans who won the IPL 2022 final, got crores of rupees
आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्सवर पडला करोडोंचा पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२ चा किताब गुजरात टायटन्सने जिंकला.
  • IPL च्या फायनलचा सामना पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती.
  • गुजरात टायटन्सच्या संघाला ट्रॉफीसोबत २० कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

IPL 2022 Prize Mone for Winning Team । अहमदाबाद : आयपीएल २०२२ चा किताब स्पर्धेत पहिल्याच वर्षी सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने पटकावला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरातच्या संघाने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ बळी राखून पराभव केला. लक्षणीय बाब म्हणजे गुजरात टायटन्स देखील राजस्थान नंतर आपल्या पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकणारा दुसरा संघ ठरला आहे. (Gujarat Titans who won the IPL 2022 final, got crores of rupees). 

अधिक वाचा : व्लादिमीर पुतीन यांचा आधीच मृत्यू झाला-गुप्तचर यंत्रणा

हार्दिक आर्मीचा बोलबाला

तत्पुर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने २० षटकांत ९ बाद १३० धावा केल्या. सलामीवीर आणि ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर या सामन्यात आपल्या अर्धशतकापासून वंचित राहिला. राजस्थानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती तरीदेखील संघाने १३१ धावांचे लक्ष्य दिले, ज्याला हार्दिकच्या सेनेने ७ गडी राखून पूर्ण केले. शुभमन गिलने ४३ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि कर्णधार हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ३४ धावा केल्या. हार्दिक पांड्याला त्याच्या शानदार खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 

गुजरातच्या संघाला मिळाले २० कोटी

आयपीएल २०२२ चा किताब जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाला ट्रॉफीसोबत २० कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात आले. एवढीच रक्कम मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला देखील दिली होती. तर उपविजेता संघ राजस्थान रॉयल्सच्या संघाला १२.५० कोटी रूपयांचे बक्षीस मिळाले. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला ६.५० कोटी रुपये मिळाले.

सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रेटींसह नेतेमंडळीची हजेरी 

लक्षणीय बाब म्हणजे आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने जेतेपद पटकावले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलच्या अधिकृत माहितीनुसार राजस्थान आणि गुजरात यांच्यातील आयपीएलच अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाख ४ हजार आणि ८५९ जण मैदानात उपस्थित होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटींसह नेतेमंडळी देखील उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. तर पंतप्रधानांच्या सुरेक्षेची काळजी म्हणून मैदानात तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी